शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

आपेटने उस्मानाबादकरांना ४ कोटींना गंडविले; तीन ठाण्यात ५९ ठेवीदारांनी केल्या तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 14:26 IST

शुभकल्याण मल्टीस्टेटच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत़

ठळक मुद्देकोट्यवधींचा गंडा घातलेला आहे़ यातील आजवर केवळ ५९ ठेवीदार तक्रारीसाठी पुढे त्यांची रक्कम ३ कोटी ९१ लाख ८८ हजार रुपये इतकी झाली आहे़.

उस्मानाबाद : शुभकल्याण मल्टीस्टेटच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध शाखांमध्ये आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तीन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत़ या संस्थेचा प्रमुख दिलीप आपेट व त्याच्या संचालक मंडळाने जिल्ह्यातील अनेक ठेवीदारांना कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे़ यातील आजवर केवळ ५९ ठेवीदार तक्रारीसाठी पुढे आले आहेत़ त्यांची रक्कम ३ कोटी ९१ लाख ८८ हजार रुपये इतकी झाली आहे़.

कळंब तालुक्यातील हावरगाव (जि़उस्मानाबाद) येथे शुभकल्याण मल्टीस्टेटची मुख्य शाखा आहे़ जिल्ह्यासह महाराष्ट्र व कर्नाटकात या मल्टीस्टेटच्या तब्बल १०३ शाखा आहेत़ शाखेतून मुदतीत पैसे मिळत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर अनेक ठेवीदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रारी देण्यास सुरूवात केली होती़ यात पहिला गुन्हा उस्मानाबाद येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता़ या गुन्ह्यात २१ जणांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली असून, १ कोटी ४० लाख १३ हजार रूपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे़.

( शुभकल्याण मल्टीस्टेटचा चेअरमन दिलीप आपेट पुण्यात जेरबंद; ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी बीड पोलिसांची कारवाई  )

वाशी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आजवर ६ जणांनीच तक्रारी केल्या आहेत़ या सहा जणांचे ३४ लाख ३२ हजार ७२८ रूपये शुभकल्याणमध्ये अडकले आहेत़ तर कळंब येथील पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर ३२ जणांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे़ या ३२ जणांची तब्बल २ कोटी १७ लाख ४२ हजार  ५३३ रूपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल आहेत़ तिन्ही गुन्ह्यात एकूण  ५९ ठेवीदारांच्या तक्रारी असून, संबंधितांचे ३ कोटी ९१ लाख ८८ हजार २६१ रूपयांच्या ठेवी शुभ कल्याण मल्टीस्टेटमध्ये अडकल्या आहेत.

उस्मानाबाद येथील आर्थिक गुन्हे शाखेने शहर शाखेतील व्यवस्थापकाला अटक केली होती़ त्यांना जामीन मंजूर झाला आहे़ मात्र, गुन्हा दाखल झाल्यापासून आपेटसह इतर संचालक फरार होते़ दरम्यान, आपेट बीड पोलिसांच्या हाती लागल्यानंतर उस्मानाबादच्या आर्थिक गुन्हे शाखेने तपासासाठी तो आपल्याही ताब्यात मिळावा, यासाठी हालचाली सुरु केल्याचे उपाधीक्षक अंजुम शेख यांनी सांगितले़.