शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी कायपण! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीने केला शोले स्टाईल ड्रामा 

By पूनम अपराज | Updated: November 9, 2020 18:38 IST

Crime News : लग्न न झाल्यास उडी मरून आत्महत्या करण्याची धमकी तिने दिली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत घालत मुलीला खाली उतरवले. जवळपास ४५ मिनिटे हे नाट्य सुरू होते.

ठळक मुद्देतरुणी ३० फूट उंच होर्डिंगवर चढून बसली होती. दरम्यान तरुणी मोबाईलवर होती. स्थानिकांनी तिला खाली उतरण्यास आग्रह केला, मात्र तिने कोणाचे ऐकले नाही. हळूहळू या परिसरात खूप गर्दी जमा झाली.

अनेकदा एकतर्फी प्रेमातून प्रियकर हाय वॉल्टेज ड्रामा करताना आपण पाहिलं. शोले चित्रपटात वीरूने बसंतीला लग्नासाठी तयार करण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढला हे दृश्य देखील आपण पाहिलं असेल. मात्र, मध्यप्रदेशमधील इंदौर येथे एका प्रेयसीने आपल्या प्रियकराने लग्नाला नकार दिल्याने हाय वॉल्टेज ड्रामा केल्याचं कळत आहे. एका अल्पवयीन मुलाशी लग्न करण्यासाठी प्रेयसी थेट होर्डिंगच्या खांबावर चढली. लग्न न झाल्यास उडी मरून आत्महत्या करण्याची धमकी तिने दिली. यावेळी पोलिसांनी तिची समजूत घालत मुलीला खाली उतरवले. जवळपास ४५ मिनिटे हे नाट्य सुरू होते.इंदौरच्या परदेशीपुरा परिसरात रविवारी सायंकाळी उशिरा एक तरुणी एका जाहिरात होर्डिंगवर मुलगी चढली आणि त्यामुळे हंगामा झाला होता. ती आपल्या प्रियकराशी लग्न करण्याच्या गोष्टीला घेऊन अडून बसली होती. तात्काळ पोलीस तेथे पोहचले आणि लग्नाबाबत खात्री देऊन तिची समजूत काढून तिला खाली उतरविले. जर प्रियकरासोबत लग्न झाले नाही तर उडी मारून आत्महत्या करेन, अशी धमकी मुलीने दिली होती.जवळपास ४५ मिनिटानंतर मुलीला होर्डिंगवरून खाली उतरवण्यात पोलिसांना यश आले. प्रियकराने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याने ती नाराज झाली आणि होर्डिंगवर चढली होती. 

 

 

तरुणी ३० फूट उंच होर्डिंगवर चढून बसली होती. दरम्यान तरुणी मोबाईलवर होती. स्थानिकांनी तिला खाली उतरण्यास आग्रह केला, मात्र तिने कोणाचे ऐकले नाही. हळूहळू या परिसरात खूप गर्दी जमा झाली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक तेथे पोहचलं आणि तरुणीला खाली उतरवले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीचे वय १८ वर्ष आहे. ती एका अल्पवयीन मुलावर प्रेम करत होती आणि त्याच्यासोबत लग्न करण्याची तिची इच्छा होती. परंतु, मुलीचे कुटुंबीय लग्न दुसरीकडे करत असल्याचा दावा मुलीने केला. यावेळी मुलीचे समुपदेशन करून कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले.  

टॅग्स :Suicideआत्महत्याMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस