शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

गँगस्टर सुरेश पुजारी गुन्हे शाखेच्या कोठडीत; मुंबईतील १७ गुन्ह्यांचा कसून तपास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 07:12 IST

न्यायालयाने त्याला  २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईत त्याच्याविरोधात १७ गुन्हे नोंद असून त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.

मुंबई : राज्य दहशतवादविरोधी पथकाच्या चौकशीनंतर गँगस्टर सुरेश पुजारीचा गुन्हे शाखेने ताबा घेतला आहे. शुक्रवारी त्याला प्रॉडक्शन वाॅरंटवरून ताब्यात घेत अटक केली आहे. न्यायालयाने त्याला  २९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबईत त्याच्याविरोधात १७ गुन्हे नोंद असून त्यानुसार, अधिक तपास सुरू आहे.पुजारीविरोधात मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि कर्नाटक या ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. फिलिपिन्समध्ये प्रेयसीसोबत बनावट नावाने राहणाऱ्या सुरेश पुजारीला १५ ऑक्टोबर २०२१ राेजी तेथील पोलिसांनी अटक केली होती.  पुढे एटीएसच्या चौकशीनंतर गुन्हे शाखेने त्याचा ताबा घेतला आहे. शुक्रवारी त्याला अटक करीत, न्यायालयात हजर केले.उल्हासनगर परिसरात कुटुंबासोबत राहण्यास असलेल्या व्यावसायिकाचे फोर्ट परिसरात कॅमेऱ्याचे दुकान आहे. त्याच्या व्यवसायावर नजर पडलेल्या सुरेश पुजारी टोळीने ६ जानेवारी २०१८ पासून ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी धमकावण्यास सुरुवात केली. दरम्यान अशा प्रकारेच खंडणी न देणाऱ्या ठाण्याच्या भिवंडी परिसरातील हॉटेल व्यावसायिकाच्या हॉटेलवर १० जानेवारीला दुपारी चारच्या सुमारास पुजारीने तीन शूटर्सच्या मदतीने गोळीबार घडवून आणला. त्यानंतर पुजारीने फोर्टमधील व्यावसायिकाला अशा प्रकारेच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देत एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी सुरू केली हाेती. खंडणीच्या तक्रारीच्या आधारे माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल करून गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने सहाजणांना अटक केली. मोक्काअन्वये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. यामध्ये पुजारी पाहिजे असलेला आरोपी होता. त्यानुसार गुन्हे शाखेने प्रॉडक्शन वाॅरंटवरून ताब्यात घेत त्याला या गुन्ह्यात अटक केली आहे.