शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

Sachin Vaze: सचिन वाझेंना उत्तरे बदलता येणार नाहीत; चांदीवाल आयोगाचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 12:13 IST

कोणाच्या तरी बचावासाठी वाझे आता उत्तरे बदलू पाहत असावेत, अशी शंकाही आयोगाने व्यक्त केली.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांच्या वतीने बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या केलेल्या उलट तपासणीतील उत्तरे वाझे यांना आता बदलता येणार नाहीत, असे न्या. कैलास चांदीवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वाझेंना धक्का बसला आहे. देशमुख यांचे वकील गिरीश कुलकर्णी यांनी आयोगासमोर वाझे यांची उलटतपासणी केली होती. त्यावेळी मी दिलेली उत्तरे ही देशमुख यांच्या दबावाखाली दिली होती. त्या दबावामुळे माझे मानसिक संतुलन पूर्णपणे बिघडलेले होते. आता मला ती उत्तरे बदलायची आहेत, असा अर्ज वाझे यांनी आयोगासमोर केला होता. तथापि, वाझे यांच्या उलट तपासणीवेळी त्यांची देहबोली दबावात असल्यासारखी नव्हती. ते शांतपणे, थांबून उत्तरे देत होते, असे निरीक्षण आयोगाने नोंदविले.

कोणाच्या तरी बचावासाठी वाझे आता उत्तरे बदलू पाहत असावेत, अशी शंकाही आयोगाने व्यक्त केली. आधीची उत्तरे बदलण्याची वाझे यांना आजच का गरज भासली? आधी दबाव होता आणि आता त्यांच्यावर दबाव नाही, अशी कोणती परिस्थिती उद्भवली, असा सवालही आयोगाने केला. देशमुख यांना पैसे देण्याचा प्रसंग आला होता का, यावर उलट तपासणीत त्यांनी नाही, असे उत्तर दिले होते. आता त्यांना ते बदलायचे होते. खंडणी गोळा करण्यास देशमुखांनी सांगितले होते का? आदी प्रश्नांची उत्तरेही त्यांना बदलायची होती, असेही आयोगाने म्हटले आहे. 

बचाव करण्याची पद्धतशीर खेळीआधी आपल्यावर देशमुखांचा दबाव होता. आता आपल्याला उत्तरे बदलायची आहेत, हा त्यांनी अर्जात केलेला युक्तिवाद आयोगाने अमान्य केला. असे उत्तर बदलण्यामागे कोणाचा तरी बचाव करण्याची पद्धतशीर खेळी दिसते. कोणाच्या तरी प्रभावाखाली येऊन उत्तर बदलण्याची भूमिका वाझेंकडून घेतली जात आहे, अशा कडक शब्दांत न्या.चांदीवाल यांनी नापसंती व्यक्त केली.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMumbai policeमुंबई पोलीस