शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून मुलगी आणि जावयाला पेटवलं; मुलीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 16:27 IST

मुलीच्या काका, मामाला अटक; वडील फरार

पुणे/अहमदनगर: आंतरजातीय विवाह केल्याने मुलगी व जावयाला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पारनेर तालुक्यातील निघोज येथे घडला. यामध्ये गंभीररित्या भाजलेल्या मुलीचा मृत्यू झाला. मुलीच्या पतीवर पुण्याच्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या मामा व काकाला अटक केली असून वडील फरार आहेत.रूक्मिणी मंगेश रणसिंग (वय १९, रा. निघोज, ता. पारनेर) असे मृत मुलीचे नाव आहे. पती मंगेश चंद्रकांत रणसिंग (वय २३) हे जखमी आहेत. मंगेश व रूक्मिणी यांचे सहा महिन्यापूर्वी लग्न झाले होते. त्यांचा आंतरजातीय विवाह होता. मंगेश हा निघोज येथे गवंडी काम करायचा. रूक्मिणीचे वडील, काका व मामा यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे ‘एक ना एक दिवस त्यांचा काटा काढायचा’ असा या तिघांचा प्रयत्न होता. ते निमित्त अखेर त्यांना मिळाले. पती-पत्नीमध्ये स्वयंपाक करण्यावरून भांडण झाले होते. त्यामुळे रूक्मिणी माहेरी निघून गेली होती.१ मे रोजी निघोज येथील वाघाचा वाडा येथे मंगेश हा रूक्मिणीला भेटण्यासाठी माहेरी घरी गेला होता. रूक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया, मामा घनशाम मोहन राणेंज, काका सुरेंद्रकुमार रामफल भरतिया या तिघांनी रूक्मिणीला मंगेश बरोबर न पाठवता त्याला मारहाण केली. यावेळी रूक्मिणी मात्र मंगेश बरोबर जाण्यास निघाली. त्यावेळी वरील तिघांनी या पती-पत्नीला घरात कोंडून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. घराला बाहेरून कूलूप लावून निघून गेले. त्या दोघांचा आरडाओरड ऐकून शेजारच्या लोकांनी त्यांना बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.अधिक भाजल्यामुळे त्या दाम्पत्याला पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीररित्या भाजलेल्या रूक्मिणीचा मृत्यू झाला. तत्पूर्वी पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांनी मंगेश व रूक्मिणी यांचा जबाब शनिवारी (दि.४) घेतला आहे. त्यात या पती-पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला ही बाब स्पष्ट झाली आहे. पोलिसांनी मुलीचा मामा घनशाम राणेंज व काका सुरेंद्रकुमार भरतिया यांना ताब्यात घेतले. रूक्मिणीचे वडील रामा रामफल भरतिया हा फरार आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली व उपनिरीक्षक विजयकुमार बोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस शिपाई श्रीनाथ गवळी व पोलीस तपास करीत आहेत.