शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत ‘एएनसी’ची धडक कारवाई सुरूच, चार जणांना अटक, ७० लाखांचे ड्रग्ज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2023 07:04 IST

इम्रान शेख, रियाझ जुमानी, मोईन हनीफ, बाजिद खान अशी चार आरोपींची नावे

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: अंमली पदार्थ विरोधी विभागाच्या (एएनसी) आझाद मैदान आणि कांदिवली कक्षाने चार तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ७० लाखांचा ड्रग्ज साठा जप्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज तस्करांविरोधात अंमली पदार्थविरोधी विभागाने जोरदार मोहीम उघडली आहे. एएनसीने दिलेल्या माहितीनुसार, आझाद मैदान एएनसी टीमने कुरेशी नगर, कुर्ला आणि नूरबाग जंक्शन डोंगरी परिसरात रात्री ऑपरेशन करून ५२ लाख एमडी ड्रग्जसह दोन आरोपींना अटक केली. अटक आरोपीपैकी इम्रान फारुख शेख विरोधात ड्रग्जच्या ४ गुन्ह्यासह पाच गुन्हे नोंद आहे. दुसरा आरोपी रियाझ इलियास जुमानी विरुद्ध ३ चोरीच्या घटनांचा समावेश आहे.

कांदिवलीच्या टीमने वांद्रे परिसरातून १७ लाखांच्या एमडीसह दोन ड्रग्ज तस्करांना अटक केली. यावर्षी एकूण १८०  ड्रग्ज तस्करांना अटक करण्यास यश आले आहे. मोईन हनीफ भुजवला (३५) आणि बाजिद अशरफ खान (२१) अशी कांदिवली कक्षाने कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्वांना कोर्टात सादर करण्यात येणार आहे.

४० कोटींचे ड्रग्ज जप्त आणि ९० गुन्हे

अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनखाली २०२३ मध्ये एकूण ९० गुन्हे दाखल करत त्यामध्ये एकूण १८० अंमली पदार्थ तस्करांना अटक केली असून, त्यांचे ताब्यातून एकूण ४० कोटीपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची तस्करी करणायां विरुध्द ६० गुन्हे दाखल करत एकूण १२१ आरोपींविरूध्द कारवाई केली असून, त्यांचे ताब्यातून अंदाजे २८ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकDrugsअमली पदार्थMumbaiमुंबई