शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिसॉर्टवर आली अन् अंगठा तोडून बसली; तब्बल सात तास झाली शस्त्रक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2023 07:59 IST

घाटकोपरच्या आदिनाथ नीलकंठ एनक्लेव्ह येथे राहणारी अंजना गाला (वय ७२) ही वृद्ध महिला २३ जानेवारीला सकाळी विरारच्या मांडवी रिसॉर्टमध्ये शंभरहून अधिक लोकांसोबत पिकनिकसाठी आली होती.

नालासोपारा : विरारमधील रिसॉर्टवर सहलीसाठी आलेल्या एका वृद्ध महिलेचा खेळायच्या तुटलेल्या स्लाइडिंगमध्ये अडकून हाताचा अंगठा तुटल्याची घटना घडली आहे. मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या निष्णात डॉक्टरांनी सात तास शस्त्रक्रिया करून हा अंगठा पुन्हा जोडला आहे. मात्र रिसॉर्ट मालकाच्या दुर्लक्षामुळे अपघात झाल्याचा आरोप महिलेने केला असून, मांडवी पोलिसांनी रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापक या दोघांविरोधात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घाटकोपरच्या आदिनाथ नीलकंठ एनक्लेव्ह येथे राहणारी अंजना गाला (वय ७२) ही वृद्ध महिला २३ जानेवारीला सकाळी विरारच्या मांडवी रिसॉर्टमध्ये शंभरहून अधिक लोकांसोबत पिकनिकसाठी आली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रिसॉर्टच्या गार्डनमधील लहान मुलांच्या स्लाइडिंगजवळ त्या घसरगुंडीसाठी गेल्या असताना तेथील तुटलेल्या स्लाइडिंगवरून खाली येत असताना त्यांचे अंगठ्याचे बोट त्यात अडकून त्याचा तुकडा पडला. अपघातानंतर तुटलेला अंगठा बर्फामध्ये ठेवत त्यांना तातडीने मुंबईतील परळच्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दुपारी चारच्या सुमारास दाखल करण्यात आले. तेथे डॉ. नीलेश सातभाई यांनी सात तास शस्त्रक्रिया करून त्यांचा तुटलेला अंगठा पुन्हा जोडला. 

चार लाखांहून अधिक झाला खर्चजवळपास चार लाखांहून अधिक खर्च त्यांना या शस्त्रक्रियेसाठी आला आहे; मात्र याबाबत रिसॉर्ट मालकांनी हात वर केले. लहान मुलांसाठी असलेल्या या स्लाइडवर आणखीही मोठा गंभीर अपघात घडू शकला असता; मात्र रिसॉर्ट मालकांनी त्या स्लाइड बदलण्याकडे आणि त्यांची डागडुजी करण्याकडे साफ दुर्लक्ष केले. अंजना गाला यांनी अखेर मांडवी पोलिस ठाण्यात रिसॉर्टचालक व व्यवस्थापक यांच्याविरोधात शनिवारी गुन्हा दाखल केला आहे.

ज्या महिलेसोबत हा अपघात झाला आहे, त्यांचे पती आणि मुलगा डॉक्टर आहेत. शनिवारी तक्रार देण्यासाठी त्या परिवारासह पोलिस ठाण्यात आल्यावर रिसॉर्टमालक आणि व्यवस्थापक दोघांवर निष्काळजीपणाबद्दल गुन्हा दाखल करण्यात. चौकशी आणि सखोल तपासाअंती रिसॉर्ट मालक आणि व्यवस्थापक यांना अटक करण्यात येईल. - प्रफुल वाघ, पोलिस निरीक्षक, मांडवी पोलिस ठाणे