शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत जमीन विक्री व्यवहारातून वृध्द शेतकरी महिलेची पाऊणे चार कोटींची फसवणूक

By नितीन पंडित | Updated: January 12, 2024 17:50 IST

याप्रकरणी महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भिवंडी: वृध्द महिलेच्या शेतजमिनीचे पैसे न देता परस्पर विक्री करून पाऊणे चार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार भिवंडीतील काल्हेर येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेने नारपोली पोलीस ठाण्यात गुरुवारी फसवणूक करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

काल्हेर गावातील रंगुबाई ऊर्फ रंगीबाई पंढरीनाथ पाटील,वय ७५ वर्षे यांच्या नावे मौजे काल्हेर येथील सर्व्हे क्रमांक १९१/२  मधील एकूण ७० गुंठे जमीन ७ लाख रुपये प्रति गुंठा दराने ४ कोटी ९० लाख रुपयांना खरेदी करण्याचे ठरवून गावातीलच राजन व्दारकानाथ भोकरे यांनी नोंदणीकृत साठेकरार करून घेत त्या बदल्यात जमीन मालक रंगुबाई व त्याच्या मुलीला १ कोटी १३ लाख ७५ हजार एवढी रक्कम दिली व ७४ लाख रुपयांचे धनादेश दिले.

राजन भोकरे याने दिलेले ७४ लाखांचे धनादेश खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स झाले.तर त्यासोबत व्यवहाराची उर्वरित रक्कम ३ कोटी ७६ लाख २५ हजार रुपये देण्याचे आश्वासन देवून ही व्यवहार पुर्ण न करताच ,वृध्द महिलेस अंधारात ठेऊन २ ऑगस्ट २०२२ रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय भिवंडी १ यांचे कार्यालयातुन दस्त नोंद करून जमीनीचे खरेदीखत स्वतःचे नावे नोंदवून तलाठी सजा काल्हेर कार्यालायातुन फेरफार क्र. ७३२३ अन्वये सदर जमीनीचा ७/१२ स्वतःचे नावे करून घेतला.विशेष म्हणजे वृध्द महिलेची मुलगी मयत असल्याने तिच्या मुलाचे नाव सदरच्या जमीन सातबाऱ्यावर वारस म्हणुन नोंद न करता मुलीचे नाव कमी केले.या प्रकरणी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने वृध्द महिलेने दिलेल्या तक्रार वरून नारपोली पोलिस ठाण्यात राजन व्दारकानाथ भोकरे या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीbhiwandiभिवंडी