शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2023 22:04 IST

डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या नागरिकांवर वारंवार भ्याड हल्ले होत असल्याने या समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

- हितेन नाईक

पालघर : भाजपचे पालघर जिल्ह्याचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष आणि डहाणू नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष भरत राजपूत आणि अन्य तीन जणांविरोधात डहाणूतील एका आदिवासी व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्या प्रकरणी ॲट्रॉसिटी आणि अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.     डहाणू तालुक्यातील एंट्रीगेट नवापाडा येथील रहिवासी असलेले प्रकाश अनंत ठाकरे यांना शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता भरत बंसराज राजपूत, त्यांचा भाऊ जगदीश बंसराज राजपूत, विशाल नांदलस्कर व राजेश ठाकुर यांनी डहाणू शहरातील रामवाडी येथील कार्यालयात बोलावले. त्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार पीडित प्रकाश यांनी केली आहे. नोव्हेबर 2022 साली भरत राजपूत व त्याच्या सहकाऱ्यांनी अरुणा भावर या आदिवासी महिलेचे अपहरण करून तिचा शोध घेणाऱ्या पती व कुटुंबीयांना मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. ह्या प्रकरणी तक्रारी झाल्या नंतर त्यांच्या विरोधात कुठलीही कठोर कारवाई झाली नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.   डहाणू तालुक्यातील आदिवासी समाजाच्या नागरिकांवर वारंवार भ्याड हल्ले होत असल्याने या समाजाच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. तथापि गुन्हेगारी प्रवृतीच्या भरत बंसराज राजपूत, जगदीश बंसराज राजपूत, विशाल नांदलस्कर व राजेश ठाकुर यांनी केलेल्या जातीवाचक शिवीगाळ व मारहाण प्रकरणी यांच्यावर आपण एट्रोसीटी कायद्याअंतर्गत गुन्हा त्वरित नोंद करुन अटक करण्याची मागणी केली होती. तक्रार करूनही त्यांच्या विरोधात डहाणू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला जात नसल्याने जिल्ह्यातील सर्व आदिवासी समाज व भूमिपुत्र यांच्याकडून 8 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता 'सरावली जकात नाका ते डहाणू पोलीस स्टेशनपर्यंत' निषेध मोर्चा काढला जाणार होता.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,पालकमंत्री रवींद्र शिंदे ह्यांचे निकटवर्तीय असल्याने पोलिस त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास नकार देत होते.परंतु सुमारे दोन हजार मोर्चेकरी पोलिस ठाण्यावर धडकणार असल्याने शेवटी डहाणू पोलिसांनी चारही आरोपी विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 (ॲट्रॉसिटी), इच्छापूर्वक दुखापत पोहचविणे,शांतता भंग करणे, धाक दाखवणे,आदी विविध कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी आपल्या जीवाला धोका असल्याने पोलीस बंदोबस्त मिळावी अशी मागणी फिर्यादी प्रकाश अनंत ठाकरे यांनी डहाणू  पोलीस निरीक्षकांकडे केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी