शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! संतापलेल्या नवऱ्यानं भररस्त्यात बायकोला विवस्त्र करुन बेदम मारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 20:32 IST

पती विरोधात पोलिसांत गुन्हा : रुईकर कॉलनीशेजारी भिमविजय सोसायटीत खळबळजनक प्रकार

कोल्हापूर - किरकोळ कारणांवरुन पत्नीला सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यात विवस्त्र करुन लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. मारहाणीत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. मानवतेला काळीमा फासणारा हा प्रकार बुधवारी रात्री उशीरा रूईकर कॉलनीशेजारील चांदणेनगरातील भिमविजय हौसिंग सोसायटीत घडला. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रूईकर कॉलनी शेजारील भिमविजय हौसिंग सोसायटीत पती-पत्नी मुलांसह राहतात. पत्नी खासगी नोकरी करते. लग्न झाल्यापासून दोघात वारंवार वाद होऊन पती तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शारिरिक व मानसिक त्रास देत होता. त्रासाला कंटाळून पत्नी मुलांसह परिसरातील माहेरी राहण्यास गेल्या होत्या. बुधवारी रात्री पत्नी कामावरुन घरी परतली, तिला घरी मुले दिसली नाहीत. पतीने मुलांना नेल्याचे समजले. संतप्त झालेल्या पत्नीने पतीला फोन केला व मुलांना नेण्यासाठी सासरचे घर गाठले. त्यावेळी पतीने तिला ‘तु घरी का आलीस?’ असा जाब विचारत शिवीगाळ केली. तिच्या अंगावर धावून सार्वजनिक ठिकाणी रस्त्यातच विवस्त्र केले. त्यानंतर त्याने नाल असलेल्या बुटाने तिच्या चेहर्यावर, हातावर, पाठीत, पोटावर लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडला. परिसररातील नागरीकांनी पतीच्या तावडीतून तिची सुटका केली. गुरुवारी शाहुपूरी पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी करत आहेत