शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने काटा काढला; ११ आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2023 21:32 IST

सदर घटनेप्रकरणी प्रथम हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नेमकी आरोपी व संबधिताकडून तथ्यता पडताळणी केली जात आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा:- धानिवबाग परिसरात राहणाऱ्या एका आरोपी महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हत्या करून अपघात झाल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांना संशय आल्याने तपासात ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले. पेल्हार पोलिसांनी या प्रकरणात हत्येच्या कटात सहभागी असणार्‍या एकुण अकरा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

नालासोपाऱ्याच्या धानिवबाग येथील परशुराम चाळीत राहणारा रिजाय अली मुन्सी राजा (५५) हे अनुज, विनीत, जितेंद्र, टेलर व अन्य ओळखीच्या लोकांसोबत २१ ऑगस्टला  कळंब समुद्रकिनार्‍यावर फिरण्यासाठी गेले होते. तर त्याच दिवशी रियाजची पत्नी मनसुरा खातून ही तिचा प्रियकर गौतम पंडित यांच्यासोबत जीवदानी येथे गेले होते. त्यानंतर रिजाय अली मुन्सी राजा याला अपघात झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तेथे त्याचा मृत्यू झाला होता. परंतु नेमका अपघात कुठे आणि कसा झाला याची माहिती त्याची पत्नी मनसुरा (३५) देऊ शकली नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

तपासामध्ये पत्नीनेच ही हत्या घडवून आणल्याचे स्पष्ट झाले. मयत रियाजची पत्नी मन्सुरा ही नालासोपारा येथील गणेश पंडीत याच्या किराणा मालाच्या दुकानात काम करते. तेथे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. गेल्या २ ते ३ वर्षांपासून हे संबंध सुरू होते. या संबंधात तिचा पती रियाज अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याची योजना बनवली. त्यानुसार त्याला फिरण्याच्या बहाण्याने नालासोपाऱ्याच्या कळंब समुद्र किनार्‍यावर नेऊन त्याची हत्या केली. मृत रियाजची बहिण नुरजहा खान हिने गुरुवारी तक्रार देऊन हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला तुळींज पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद होती. मात्र हत्येचे नियोजन पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्याने गुन्हा पेल्हारमध्ये वर्ग केला आहे.

सदर घटनेप्रकरणी प्रथम हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी नेमकी आरोपी व संबधिताकडून तथ्यता पडताळणी केली जात आहे. ही हत्या नेमकी कशी व कोणत्या कारणांमुळे झाली याचाही तपास करत आहे. पेल्हार पोलिसांची टीम, तुळींज आणि गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस वेगवेगळ्या पद्धतीने गुन्ह्याचा तपास करत आहे. - वसंत लब्दे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पेल्हार पोलीस ठाणे)