शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय कोर्टाने २६ डिसेंबरपर्यंत ठेवला राखून

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 16:37 IST

त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.   

ठळक मुद्देआज दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला विनता नंदा यांनी महिन्याभरापूर्वी आलोकनाथ यांच्यावर २० वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचे आरोप लावले या खटल्याच्या निकालाकडे बॉलिवूड क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मुंबई - #MeToo चळवळीतून ज्येष्ठ अभिनेते आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या लेखिका विनता नंदा यांचे सर्व आरोप काल्पनिक असल्याचा दावा आलोकनाथ यांचे वकील देवेंद्र घोबुरम यांनी मागील सुनावणीदरम्यान कोर्टात केला होता. अशा प्रकारे कोर्टासमोर त्यांनी विनता नंदा यांच्या चारित्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.  त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा दावाही त्यांनी केला होता. त्यानंतर आज दिंडोशी सत्र न्यायालयाने आलोकनाथ यांच्या अटकपूर्व जामीनावरील निर्णय २६ डिसेंबरपर्यंत राखून ठेवला आहे.   विनता नंदा यांनी महिन्याभरापूर्वी आलोकनाथ यांच्यावर २० वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा आरोप लावला आणि ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. कोर्टात खटला उभा राहिल्यानंतर विनता नंदा यांचे अनेक वैवाहिक पुरुषांशी संबंध होते असा आरोप आलोकनाथ यांच्या वतीने करण्यात आला. आलोकनाथ आणि त्यांच्या पत्नीमध्ये भांडण निर्माण करण्याच्या दृष्टीने विनता नंदांनी प्रयत्न केल्याचाही आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे त्या अट्टल दारूड्या असून अमली पदार्थांच्या आहारी गेल्या आहेत असा युक्तवाद आलोकनाथ यांचे वकिल कोर्टासमोर ठेवत असताना विनता नंदा यांच्या वकीलांनी मात्र विनता नंदाचे चारित्र्यहनन करण्यात येत आहे असं म्हणत या आरोपांना तीव्र विरोध केला होता. त्यामुळे या खटल्याच्या निकालाकडे बॉलिवूड क्षेत्रासह सर्वांचे लक्ष लागले आहे. 

टॅग्स :AloknathआलोकनाथMetoo CampaignमीटूSessions Courtसत्र न्यायालयCourtन्यायालय