शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अकोला महापालिकेचा भूखंड हडप प्रकरणात फौजदारी; आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:06 IST

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा चार हजार स्क्वेअर फुटाचा तब्बल एक कोटी रुपयांचा शासकीय भूखंड हडपणाऱ्या दोघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्दे रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल व शेख नवेद शेख इब्राहीम अशी आरोपींची नावे असून, यामधील शेख नवेदला अटक करण्यात आली आहे.रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकल्याचे दाखविले होते. भूखंडाची नोंद शेख नवेद याच्या नावे घेतली होती; मात्र बुढन गाडेकर यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला.

- सचिन राऊत

अकोला : अकोला महानगरपालिकेच्या मालकीचा चार हजार स्क्वेअर फुटाचा तब्बल एक कोटी रुपयांचा शासकीय भूखंड हडपणाऱ्या दोघांविरुद्ध सिटी कोतवाली पोलिसांनी मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल व शेख नवेद शेख इब्राहीम अशी आरोपींची नावे असून, यामधील शेख नवेदला अटक करण्यात आली आहे.अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर नझुल शिट क्रमांक ३७ ए व प्लॉट क्रमांक-४ असा चार हजार स्क्वेअर फूट भूखंड तत्कालीन नगरपालिकेचा व आताच्या महानगरपालिकेच्या मालकीचा आहे. या भूखंडाचा मूळ हक्क व आखीव पत्रिका महानगरपालिकेच्या मालकीची असताना हा भूखंड रमेशचंद्र रामगोपाल अग्रवाल यांनी लीजवर घेतल्याचे दाखवून नगरविकास विभागाच्या परवानगीने शेख नवेद शेख इब्राहीम यांना विकल्याचे दाखविले होते. त्यानंतर खरेदी-विक्रीच्या आधारेच भूमि अभिलेख विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या भूखंडाची नोंद शेख नवेद याच्या नावे घेतली होती; मात्र बुढन गाडेकर यांच्या तक्रारीनंतर ‘लोकमत’ने या प्रकरणाचा पर्दाफाश केला. त्यानंतर मनपा आयुक्त व भूमि अभिलेख विभागाने ही नोंद रद्द करून भूखंड मनपाच्या नावे करण्यात आला. त्यानंतर मनपा आयुक्त यांनी या प्रकरणात फौजदारी कारवाई करण्यासाठी सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मंगळवारी रात्री भूखंड हडप करणारा रमेशचंद्र अग्रवाल व खरेदी करणारा शेख नवेद या दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अग्रवालला वाचविण्यासाठी खटाटोप!महापालिकेच्या मालकीचा भूखंड रमेशचंद्र अग्रवाल याने लीजवर घेतला. त्यानंतर बनावट दस्तावेजाद्वारे त्यानेच हा भूखंड शेख नवेद यांना विक्री केला. त्यामुळे या प्रकरणातील मुख्य दोषी अग्रवाल असताना त्याने पोलीस कारवाईपासून वाचण्यासाठी हा सर्व घोटाळा शेख नवेद यांनीच केल्याचे एक प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची तयारी सुरू केली आहे; मात्र शेख नवेद यांच्यापेक्षाही मोठा दोषी रमेशचंद्र अग्रवाल असल्याने त्यांना वाचविण्यासाठी मंगळवारी दिवसभर काही लोकप्रतिनिधींनी ‘लॉबीग’ केली मात्र पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम असून ते आरोपीचा शोध घेत आहेत. दुय्यम निबंधकचे अधिकारीही रडारवर!या भूखंडाची खरेदी-विक्री झाल्याने खरेदी-विक्री व्यवहार करणारे दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचाºयांवर फौजदारी कारवाई होणार आहे. खरेदी-विक्रीच्या व्यवहारासाठी आवश्यक दस्तावेज नसतानाही खरेदी-विक्रीचा व्यवहार झाल्याने येथील अधिकारीही यामध्ये सहभागी असल्याने त्यांनाही लवकरच बेड्या ठोकण्यात येणार आहेत, तर नोंद घेणारे अहिरे व काळेही पोलिसांच्या रडारवर आहेत.