शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एका रसगुल्ल्यामुळे लग्न मंडपात पसरली शोककळा; नवरीचं कुटुंब फरार, १२ जखमी अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 17:32 IST

खुर्ची, चाकू, ताट, चमचा, काटा, हातात जे काही मिळेल त्याला शस्त्र बनवलं. या हाणामारीत २० वर्षीय सनीचा चाकू लागल्याने मृत्यू झाला.

आग्रा येथे एका रसगुल्ल्यामुळे लग्नाच्या आनंदात दु:खाचं विरजन पडलं आहे. लग्नाच्या वऱ्हाडासोबत आलेल्या २० वर्षीय मुलाचा चाकू लागल्याने मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. घटनेनंतर वऱ्हाड  लग्नाशिवाय माघारी परतलं. बुधवारी ही घटना घडली. खंडौली येथे राहणारे व्यापारी वकार यांची दोन मुले जावेद आणि रशीद यांचा विवाह एतमादपूर येथे राहणार्‍या उस्मानच्या मुली जैनब आणि साजिया यांच्याशी होणार होता. 

वऱ्हाडी मंडळींना जेवण दिले जात होते. एका पाहुण्याने रसगुल्ला आवडल्यामुळे आणखी एक खाण्यासाठी मागितला. त्यावर काउंटरवर उभ्या असलेल्या तरुणाने प्रत्येकाला एक-एक मिळेल असं सांगितल्याने वाद झाला. या वादाचे रुपांतर रक्तरंजित चकमकीत झाले. दोन्ही बाजूची मंडळी एकमेकांना भिडली. खुर्ची, चाकू, ताट, चमचा, काटा, हातात जे काही मिळेल त्याला शस्त्र बनवलं. या हाणामारीत २० वर्षीय सनीचा चाकू लागल्याने मृत्यू झाला.

अर्ध वऱ्हाड जेवून परत निघालेमृत युवक सनीचा काका इम्रान यांनी सांगितले की, आम्ही वेळेवर वऱ्हाड घेऊन विनायक भवनला पोहोचलो होतो. वऱ्हाड येताच जेवणाच्या पंगती बसल्या. दीड तासात जेवण करून अर्ध वऱ्हाड परत निघालं होतं. प्रत्येकाला घरी जायचे होते. लग्नासाठी वराचे काही खास नातेवाईक आणि मित्रच राहिले होते.सनीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलया घटनेमुळे नववधूंच्या घरी शोककळा पसरली असून, मृत सनीच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. आता पोलीस या प्रकरणाच्या तपासात गुंतले आहेत. मृत सनीचे काकाने महिलांचा छळ आणि दागिने लुटण्यात आल्याचा आरोपही केला आहे. या प्रकरणी एसपी सत्यजीत गुप्ता म्हणाले की, या घटनेत शाहरुख, निजाम, शकील, जानू, रहमान रमिया यांच्यासह १२ जणांपेक्षा अधिक जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटना झाल्यापासून नवरीकडचं संपूर्ण कुटुंब फरार झालं आहे.