शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

ब्रेकअपनंतर फेक व्हिडिओ व्हायरल करण्याची मुलीला धमकी, गुन्हा दाखल

By प्रदीप भाकरे | Updated: September 10, 2023 13:50 IST

याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी मंगेश विठ्ठलराव दारोकार (२५, रा. महादेवखोरी) याच्याविरूद्ध विनयभंग व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

अमरावती: अल्पवयीन मुलीशी ब्रेकअप झाल्यानंतर देखील तिचा पाठलाग करत तिला फेक व्हिडिओ व्हायरल करण्याची गर्भित धमकी देण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी एका अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी मंगेश विठ्ठलराव दारोकार (२५, रा. महादेवखोरी) याच्याविरूद्ध विनयभंग व पॉस्कोअन्वये गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार फिर्यादी अल्पवयीन मुलगी व आरोपी हे परस्परांच्या ओळखीचे आहेत. काही महिन्यांपुर्वी आरोपी मंगेशने तिला प्रपोझ केले. त्यामुळे पुढे त्यांच्यात मोबाईल चॅटिंग सुरू झाली. सोशल मिडियावर देखील संवाद वाढला. ते युगूल कॅफेमध्ये भेटत होते. मात्र, मागील तिन चार महिन्यांपुर्वी अंदाजे मे महिन्यांपासून त्यांनी एकमेकांसोबत बोलत बंद केले. त्यामुळे आरोपीने तिला तुझा फेक व्हिडीओ व्हायरल करेन, अशी धमकी देवून शिवीगाळ केली. फिर्यादी अल्पवयीन मुलीने बोलणे टाळले असता त्याने महादेवखोरी पुलापासुन राजापेठपर्यंत तिचा ट्युशनला जात असतांना पाठलाग केला.

"मला थोडे पैसे दे"दरम्यान ६ सप्टेंबर रोजी दुपारी आरोपी मंगेशने तिला व्हॉट्सॲपवर मेसेज करत तिला एका ठिकाणी बोलावून घेतले. त्याने तिला थोडे पैसे दे, अशी मागणी केली. त्यावर तिने नकार दिला असता आरोपीने भांडण सुरू केले. ८ सप्टेंबर रोजी त्याने तिला पुन्हा प्रशांत नगर गार्डनलगतच्या कॅफेमध्ये भेटायला बोलावले. भीतीपोटी ती गेली देखील. मात्र ती व तो तिच्या बहिणीला दिसून आले. त्यामुळे बहिणीने त्यांना जाब विचारला. सबब, पिडित अल्पवयीन मुलीने संपुर्ण घटनाक्रम आई-वडील व बहिणीकडे कथन केला. त्यानंतर तक्रार नोंदविली गेली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी