शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! लग्नास नकार दिल्यानं प्रेयसीनं प्रियकाराला आधी Kiss केले, मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2021 11:18 IST

या गल्लीत युवक आणि युवती एकमेकांशी बोलत होते. परंतु अचानक प्रेयसीनं प्रियकराला लग्नाची मागणी घातली.

पश्चिम बंगालच्या कटवा येथे एकतर्फी प्रेमातून खळबळजनक घटना घडली आहे. याठिकाणी युवकाने लग्नास नकार दिल्याने युवतीने आधी त्याच्या गालावर Kiss केली आणि त्यानंतर त्याला शटर गननं गोळी मारली. कटवा येथील सर्कस मैदान परिसरातील ही हैराण करणारी घटना आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री साडेआठ वाजता सर्कस मैदान परिसरात एका गल्लीमध्ये प्रेयसीनं प्रियकराला बोलावलं होतं.

या गल्लीत युवक आणि युवती एकमेकांशी बोलत होते. परंतु अचानक प्रेयसीनं प्रियकराला लग्नाची मागणी घातली. मात्र प्रियकराने नकार दिला. हा राग सहन न झाल्याने प्रेयसीने प्रियकराचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने बळजबरीने त्याच्या गालावर पप्पी घेतली त्यानंतर त्याला गोळी मारली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशत माजली. पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. बगान पाडा येथील मनिषा खातून कटवाच्या केसिया माठपाडा येथील रहिवासी लाल चंद्र शेखसोबत जवळपास ३ वर्षापासून प्रेमसंबंध होते. हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने प्रियकर लालचंद लग्नासाठी तयार झाला नाही. त्यावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला.

गल्लीत बोलावून चर्चा केली मग गोळी मारली

लालचंदने सांगितले की, त्याच्या प्रेयसीचे अन्य कुणासोबत संबंध सुरु होते. परंतु ती त्यास नकार देत होती. त्यानंतर प्रेयसी १ वर्षापूर्वी कटवा सोडून निघून गेली. आता ती झारखंडमध्ये राहत होती. परंतु मागील मंगळवारी रात्री ती झारखंडहून कटवा येथे परतली. प्रेयसी मनिषाने सर्कस मैदानच्या एका गल्लीत मला भेटण्यासाठी बोलावलं होतं. तिने आधीच प्लॅन केला होता. गोळी प्रियकराच्या जॅकेटला लागून निसटली. लालचंद या हल्ल्यात थोडक्यात बचावला. मात्र या घटनेनंतर प्रेयसी फरार झाली.

प्रियकर बचावला, हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

गोळीचा आवाज ऐकून परिसरातील लोकं हैराण झाले. घटनेची माहिती मिळताच कटवा ठाण्यातील पोलीस तिथे पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत असलेल्या लालचंदला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. तर प्रेयसीच्या घरच्यांचा दावा आहे की, मनिषा तिच्या बॉयफ्रेंडसोबत संबंध ठेऊ इच्छित नव्हती. तरीही लालचंद तिच्यावर दबाव टाकत होता. लालचंदकडेच बंदूक होती. ती त्याने स्वत:वर मारली. मात्र पोलीस आरोपी मनिषाचा शोध घेत आहेत. मनिषाला बंदूक कशी मिळाली? तिच्यासोबत आणखी कोणी होतं का? या सर्व बाबी पोलिसांकडून तपासल्या जात आहेत.

टॅग्स :Firingगोळीबार