शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’ गाणे ऐकताच तरुणाच्या मनात आला आत्महत्येचा विचार; नांदेड जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 10:41 IST

हंगेरियन गाणे ऐकून ढासळले मानसिक संतुलन, तरुणावर मानसोपचार सुरू

शिवराज बिचेवार  नांदेड : एखादं चांगलं गाणं किंवा संगीत ऐकलं की, कितीही ताणतणाव असला तरी आपलं मन प्रसन्न होतं. सुख-दु:खाच्या प्रत्येक प्रसंगात गाणी आपल्याला साथ करत असतात; पण एखादं गाणं ऐकल्यावर आत्महत्येचा विचार मनात येतो, असं कुणी सांगितलं तर...? विश्वास बसणार नाही; पण असा प्रकार घडलाय एका हंगेरियन गाण्याच्या बाबतीत. मुदखेड तालुक्यातील एका तरुणाने नैराश्यात असताना हे हंगेरियन गाणं ऐकलं आणि त्याचं मानसिक संतुलन बिघडलं. त्याच्यावर आता मानसोपचारतज्ज्ञ उपचार करत आहेत.    

हंगेरीतील संगीतकार रेजसो सेरेस यांनी पहिल्या महायुद्धानंतर १९३३ मध्ये ‘सॅड संडे’ अर्थात ‘ग्लुमी संडे’ नावाचे गाणे तयार केले होते. हे गाणे प्रेमभंगावर आधारित होते. हे गाणे हृदयाला एवढे भिडणारे आहे की, ऐकणाऱ्याच्याही वेदना त्यामुळे ताज्या होतात. हे गाणे ऐकून अनेकांनी त्या काळात आत्महत्या केल्या होत्या. परिणामी या गाण्यावर बंदी घालण्यात आली होती; परंतु नंतर ही बंदी उठविण्यात आली. त्यानंतर हे गाणे रिकंपोझही करण्यात आले; परंतु तरीही आत्महत्येचे सत्र थांबले नाही.   

नेमके हेच गाणे मुदखेड तालुक्यातील एका तरुणाने ऐकले. तो व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यातून त्याचे शिक्षण सुटले आणि तो नैराश्यात गेला होता. त्यात त्याने यूट्यूबवर हिंदी भाषेत भाषांतरित केलेले हे हंगेरियन गाणे ऐकले. गाणे ऐकल्यापासून त्याच्या मनात सारखे आत्महत्येचे विचार येऊ लागले. कुटुंबीयांना ही माहिती समजल्यानंतर त्याला मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचारासाठी दाखल केले; परंतु आताही या गाण्याची केवळ धून वाजली तरी, त्याला दरदरून घाम येतो. तो ओरडायला लागतो.    

नैराश्यग्रस्त असणाऱ्या किंवा अगोदरच मनात आत्महत्येसारखे विचार येत असलेल्या व्यक्तीने हे गाणे ऐकल्यानंतर नैराश्य आणि आत्महत्येचे विचार बळावू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी हे गाणे ऐकू नये.  - डॉ. रामेश्वर बाेले, मानसोपचार तज्ज्ञ

प्रेमभंग झाल्याने तयार केले गीत   रेजसो सेरेस हे एक पियानो वादक होते. त्यात करिअर करण्याची त्यांची इच्छा होती. त्यात यश न मिळाल्याने प्रेयसीने सेरेसची साथ सोडली. प्रेमभंग झाल्यामुळे तिच्या आठवणीत सेरेसने हे गीत लिहिले होते. या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली; पण त्याचबरोबर आत्महत्याही वाढल्या.  

गुगलवरही येते सूचना हंगेरियन सॅड साँग सर्च करीत असताना गुगलवरही एक सूचना येते. हे गाणे ऐकल्यानंतर शरीराला इजा किंवा आत्महत्या करण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे स्वत:च्या जबाबदारीवर हे गीत ऐकावे, अशी सूचना येते.