शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Video: दारूच्या नशेत युवकाचं भान हरपलं, स्वत:च्या छातीवरच चाकू मारल्यानं मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 14:17 IST

डिजेवर लागलेल्या गाण्याच्या तालावर डान्स करताना युवकाचे भान हरपले त्याने हातातील चाकूने स्वत:च्या छातीवर वार करण्याची  एक्शन जीवावर बेतली.

इंदूर – होळी आणि धुळवडीनिमित्त देशभरात सगळीकडे जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळत होतं. यावेळी मध्य प्रदेशातील इंदूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. नेहमी स्टंट करण्याच्या नादात काहींचे इतके भान हरपते ज्यामुळे त्यांचा जीव जातो. इंदूरच्या बाणगंगा परिसरात याची प्रचिती पाहायला मिळाली. ज्याठिकाणी होळी दहनाच्या कार्यक्रमावेळी नशेत धुंद असलेल्या व्यक्तीने स्वत:वर चाकू मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

नशेत धुंद असणारी तरूणांची टोळकी डान्स करत होती. तेव्हा एकाच्या हातात चाकू होता. डान्स करताना या युवकानं स्टंट करत चाकू स्वत:च्या छातीवर मारला. नशेत त्या युवकाचं भान इतकं हरपलं की तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर या युवकाच्या त्याच अवस्थेत हॉस्पिटलला उपचारासाठी नेले परंतु तिथे त्याचा मृत्यू झाला. बाणगंगा पोलिसांच्या मते, गुरुवारी मध्यरात्री ३ च्या सुमारास कुशवाह नगर येथे राहणारा ३८ वर्षीय गोपाळ नशेत धुंद होता. त्यावेळी तो त्याच्या मित्रांसोबत डीजेवर डान्स करत होता.

डिजेवर लागलेल्या गाण्याच्या तालावर डान्स करताना युवकाचे भान हरपले त्याने हातातील चाकूने स्वत:च्या छातीवर वार करण्याची  एक्शन जीवावर बेतली. ३-४ वेळा छातीवर चाकू मारल्याने नशेत धुंद असलेला युवक गंभीर जखमी झाला. ज्यानंतर त्याच्या शरीरातून रक्त वाहू लागले. त्याच्यासोबत नाचणाऱ्या इतरांना कळेपर्यंत खूप उशीर झाला. जेव्हा त्यांना कळालं तेव्हा जखमी अवस्थेत युवकाला अरबिंदो रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र उपचारावेळी युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. डान्स करताना कुटुंबातील इतर सदस्य व्हिडीओ बनवत होते. तेव्हा हा सगळा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला.

गोपाळ त्याची पहिली पत्नी आणि मुलगा आईवडिलांसह बाणगंगा परिसरात राहतो. होळी दहनाच्या कार्यक्रमाची सगळीकडे उत्साह पाहायला मिळत होता. परंतु यात गोपाळ आणि त्याच्या मित्रांनी प्रचंड दारू प्यायली होती. याच दारूच्या नशेत सर्व मुलं नाचत होती. परंतु गोपाळच्या हातातील चाकूनं त्याचा घात केला आणि नशेच्या धुंदीत त्याने स्वत:वर चाकू मारल्याने ही भयंकर घटना घडली. सध्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.