शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

अन्य मित्राला भेटल्याच्या रागात आफताबने केले होते श्रद्धाचे तुकडे; ६,६२९ पानांचे आरोपपत्र 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 06:01 IST

श्रद्धा वालकर ही अन्य एका मित्राला भेटण्यासाठी गेली होती. ते आफताब पूनावाला याला आवडले नाही आणि तो संतप्त झाला.

नवी दिल्ली :

श्रद्धा वालकर ही अन्य एका मित्राला भेटण्यासाठी गेली होती. ते आफताब पूनावाला याला आवडले नाही आणि तो संतप्त झाला. त्या भरातच त्याने श्रद्धाला ठार मारले, असे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी स्पष्ट केले. या प्रकरणात पोलिसांनी साकेत न्यायालयात आफताब याच्याविरुद्ध ६६२९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. 

आफताब याने गतवर्षी आपली लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकर हिची गळा दाबून हत्या केली होती. त्यानंतर त्याने मृतदेहाचे ३५ तुकडे करुन शहराच्या विविध भागात टाकल्याचा आरोप आहे. हा खटला पुढे चालून आता आफताबला शिक्षा होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

१५० जणांचे जबाब - संयुक्त पोलिस आयुक्त (दक्षिण) मीनू चौधरी यांनी सांगितले की, ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी श्रद्धा ही आपल्या अन्य एका मित्राला भेटण्यासाठी गेली होती. - ते आफताब याला आवडले नाही. त्यानंतर तो प्रचंड संतापला आणि या संतापाच्या भरात त्याने श्रद्धाला ठार मारले. - पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी भादंविच्या कलम ३०२ आणि २०१ नुसार आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यात १५० पेक्षा अधिक लोकांचे जबाब आहेत.  

न्यायालयीन काेठडीत वाढ- पोलिसांनी हे आरोपपत्र मंगळवारी दाखल केले. त्यानंतर आफताबच्या न्यायालयीन कोठडीत दोन आठवड्यांची वाढ करुन ७ फेब्रुवारीपर्यंत कोठडी वाढविण्यात आली आहे. - मंगळवारी न्यायालयीन कोठडीचा कालावधी संपल्यानंतर आफताब यास व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयात हजर करण्यात आले होते. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर