शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रुपी बँकेच्या १३८ थकबाकीदारांच्या मालमत्तेवर आली टाच;त्यांच्याकडे १०० कोटीहून अधिक थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 13:36 IST

आर्थिक अनियमिततेमुळे रुपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत.

ठळक मुद्देशोध घेऊन कारवाई : ९४.३८ कोटींच्या मालमत्तेवर चढविला बोजा 

विशाल शिर्के 

पिंपरी : रुपी को-आॅपरेटिव्ह बँकेने १३८ थकबाकीदारांची मालमत्ता शोधून, त्यावर टाच आणण्यात यश मिळविले आहे. त्यांच्याकडे शंभर कोटी रुपयांहून अधिक थकबाकी असून, ९४.३८ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कजार्चा बोजा चढविण्यात आला आहे. 

आर्थिक अनियमिततेमुळे रुपी बँकेवर रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने फेब्रुवारी २०१३ रोजी आर्थिक निर्बंध घातले आहेत. लाखो ठेवीदारांचे तब्बल बाराशे कोटी रुपये बँकेत अडकले आहेत.  १ लाख रुपयांपर्यंत ठेवी असलेले खातेदार सुमारे ४ लाख ७० हजार आणि एक लाखावरील ठेवीदार-खातेदारांची संख्या सुमारे २७ हजार इतकी आहे. एक लाखावरील ठेवी या साडेनऊशे कोटी रुपयांहून अधिक आहेत. तर, एक लाखापर्यंत असलेल्या ठेवी तीनशे कोटी रुपयांच्या आहेत.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेमध्ये रुपी बँकेचे विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव आरबीआयकडे प्रलंबित आहे. दरम्यान, बँक प्रशासनानेदेखील जुन्या थकबाकीदारांच्या वसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. कोरोनामुळे (कोविड-१९) ही मोहीम काहीशी संथ झाली असली, तरी १३८ थकबाकीदारांची मालमत्ता शोधून त्यावर टाच आणण्यात आली. या थकबाकीदारांकडे बँकेची तब्बल १०४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. या थकबाकीपोटी ९४ कोटी ३८ लाख रुपयांच्या मालमत्ता शोधून त्यावर टाच आणली आहे. त्यात सदनिका, बंगला, जमीन, दुकाने, कार्यालये अशा स्वरूपाच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्ता त्यांना परस्पर विकता येणार नाहीत. 

कर्जबुडव्यांच्या जामिनदारांकडे मालमत्तेबाबत चौकशी केली जाते.  महसूल विभाग, महानगरपालिका, प्राप्तिकर विभाग आणि पॅन नंबरच्या आधारे मालमत्तेचा शोध घेऊन त्यावर टाच आणली जाते. 

अपत्याच्या नावे बेकायदेशीर मालमत्ता

कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार काहीवेळा १८ वर्षांखालील मुला-मुलींच्या नावावर मालमत्ता दाखवितात. अशा प्रकरणामध्ये बँक फौजदारी दावा करून संबंधित व्यवहार बेकायदेशीर असल्याचे दाखवून देते. त्यानंतर संबंधित मालमत्तेवर बोजा चढविला जातो. अशीच कारवाई गृहिणीच्या नावे केलेल्या मालमत्तेच्या बाबतही केली जाते. मालमत्तेवर टाच आणण्याची प्रक्रिया केली जाते. 

- नितीन लोखंडे, महाव्यवस्थापक, रुपी बँक

जून २०२० अखेरची बँकेची स्थिती

राज्यातील शाखा ३५

एकूण ठेवी १२९०.०९ कोटी 

ठेवीदार ४,९७,७८१ 

कर्जे २९८ कोटी

वसुली ०.४२ कोटी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRupee Bankरुपी बँकfraudधोकेबाजीReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक