शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाताना १७ वर्षीय मुलीवर ॲसिड हल्ला; चेहरा, डोळ्याला गंभीर जखमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 06:28 IST

दिल्लीतील घटना; एका संशयिताला घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : मास्कधारी दोन व्यक्तींनी दिल्लीमध्ये बुधवारी १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलीवर ॲसिड हल्ला केला. त्यात चेहरा, डोळ्याला गंभीर जखमा झालेल्या या मुलीवर सफदरजंग रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू आहेत. या हल्ल्याबाबत दोन संशयितांची नावे पीडित मुलीने पोलिसांना सांगितली असून त्यातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्याचा समाजातील सर्व स्तरांतून तीव्र निषेध करण्यात येत आहे.

ही मुलगी धाकट्या बहिणीसोबत  सकाळी शाळेत जात असताना दिल्लीतील उत्तमनगरामध्ये तिच्यावर ॲसिड हल्ला झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. 

ॲसिड मिळालेच कसे?ॲसिड विक्रीवर बंदी असतानाही हल्लेखोरांना ॲसिड उपलब्ध झालेच कसे, असा सवाल नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही या घटनेचा तीव्र निषेध केला आहे.संपूर्ण बंदी कधी : महिला आयोग ॲसिड विक्रीवर संपूर्ण बंदी घालावी, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही करत आहोत. दिल्लीतील ॲसिड हल्ल्यानंतर तरी सरकारला जाग येईल, अशी अपेक्षा दिल्ली महिला आयोगाने व्यक्त केली आहे.

घरातून निघाल्यानंतर लगेचच हल्लाn त्या मुलीच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितले की, माझी मुलगी व तिची धाकटी बहीण शाळेत जाण्यासाठी घरातून सकाळी साडेसात वाजता निघाल्या. n त्यांनी घरासमोर रस्ता ओलांडला व मुलीवर ॲसिड हल्ला झाला. घरातून निघाल्यानंतर अवघ्या सहा ते सात मिनिटांत ही घटना घडली. माझ्या धाकट्या मुलीने धावत येऊन हा सारा प्रकार सांगितल्याने आम्ही तडक घटनास्थळी गेलो.