शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिलेची हत्या करणारा आरोपी १२ तासात गजाआड; आरोपीची आई देखील अटकेत

By अजित मांडके | Updated: September 8, 2022 19:07 IST

मयत महिला त्याच परिसरात भिशी चालवत असून ती सावकारीचे ही काम करीत असे.

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : वयोवृद्ध जिजाबाई केदार या महिलेची गळा चिरून हत्या केल्यानंतर त्या महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या नारायण विजयलाल केवट (२७) याच्यासह हा गुन्हा केल्याचे माहिती असताना, ती माहिती लपवून मारेकऱ्याला मदत करणारी त्याची आई सुभावती (४७) हिला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. तसेच हा गुन्हा अवघ्या १२ तासाच्या आत उघडकीस आणला. ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अटक केलेल्या मायलेकांना येत्या १३ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती वागळे इस्टेट परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वागळे इस्टेट,किसननगर नं. २,संजय गांधी नगर, शिवदेवी मंदिराचे बाजुला, पाईप लाईन जवळ मयत जिजाबाई केदार (६५) आणि मारेकरी नारायण आणि त्याची आई सुभावती केवट हे शेजारीच राहत. ५ सप्टेंबरपासून मयत जिजाबाई या हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.तसेच मयत महिलेच्या राहते घराला बाहेरून कुलुप लावलेले व घरातुन दुर्गधी येत असल्याची बाब पुढे आल्यावर पोलिसांनी त्या घराचे कुलूप तोडले. त्यावेळी घरामध्ये जिजाबाई यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळुन आला. 

याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल शिंदे यांच्या पथकाने  कोणताही सुगावा नसताना मोठया कौशल्याने व चिकाटीने तपास करून हा गुन्हा उघडकीस आणत मारेकऱ्याला अटक केली.तसेच या गुन्ह्यांची माहिती असताना ती माहिती लपविण्यासाठी मदत करणाऱ्या मारेकऱ्याची आई सुभावती हिचा देखील या गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर अटक केली. 

मयत महिला त्याच परिसरात भिशी चालवत असून ती सावकारीचे ही काम करीत असे, तसेच तिचा नवरा हा १५ वर्षांपासून बेपत्ता असल्याने ती एकटीच राहत होती. तर मारेकरी हा नशेबाज असून तो कोणताही कामधंदा करत नसल्याचे तपास समोर आले आहे. त्याच्यावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे प्राथमिक तपासात दिसत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे