शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

१५ वर्षे फरार आरोपी  टॅटूवरून जाळ्यात, मुंबई, गुजरातमध्ये गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2023 10:45 IST

मुंबईतील भांडुप, अँटॉप हिल, सायन तसेच गुजरात येथील पोखारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे.

मुंबई : हाताच्या टॅटूवरून घरफोडीच्या गुन्ह्यात १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यास रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना यश आले आहे. आरमुगम पल्लास्वामी देवेंद्र (६३) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिस अधिक तपास करत आहेत. 

पोलिस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमुद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक सपोनि महेश लामखडे, अंमलदार नारायण कदम,  सुरेश कडलग, लक्ष्मण निकम यांनी ही कारवाई केली आहे. न्यायालयाने आरोपीला फरार घोषित केले होते.आरोपीचा फोटो अभिलेखावर नव्हता. तसेच तो  वारंवार पत्ते बदलून कल्याण, माहीम, भांडुप तसेच कामाच्या ठिकाणी कोठेही राहण्यास असल्याने त्याच्यापर्यंत पोहोचण्यास पथकाला अडचणी निर्माण होत होत्या.

यादरम्यान, त्याच्या उजव्या हाताच्या मनगटावर ‘बदाम व क्रॉस’ या गोंदणांची नोंद आढळून आली. तोच धागा पकडून पथकाने तपास सुरू केला. खात्याअंतर्गत विविध ॲपवर समान नावाचे वेगवेगळे आरोपी दर्शवत होते. खबऱ्याकडून आरोपीचा मोबाइल क्रमांक मिळवून विविध बँकांशी त्यावरून पत्रव्यवहार करून त्याचा फोटो  मिळविला. त्याने ते खातेदेखील वापरणे बंद केले होते. 

अशी केली अटक... तो वेगवेगळ्या प्रेक्षणीयस्थळी वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यातूनच तो ‘मुंबई दर्शन’ मार्गावर चालक म्हणून काम करत असल्याच्या शक्यतेतून शोध सुरू केला.   अखेर फोर्टस्थित ट्रॅव्हल एजन्सीला त्याची ओळख पटली. मुंबई दर्शनाचा प्लॅन असल्याचे सांगून देवेंद्रला बोलावून घेतले.  तो जाळ्यात अडकताच त्याच्यावर कारवाई केली. तो देवेंद्रऐवजी ‘मुदलीयार’ असा बदल करून वावरत होता. त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे आव्हान होते. 

मुंबई, गुजरातमध्ये गुन्हामुंबईतील भांडुप, अँटॉप हिल, सायन तसेच गुजरात येथील पोखारा पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्ह्यांची नोंद आहे.

टॅग्स :Arrestअटक