शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सोन्याच्या दातामुळे १५ वर्षांनी आरोपी जाळ्यात, मुंबई पोलिसांची कामगिरी; नेमकं प्रकरण काय वाचा...

By मनीषा म्हात्रे | Updated: February 10, 2023 13:34 IST

आवड म्हणून लावलेल्या सोन्याच्या दोन दातांमुळेच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

मुंबई :

आवड म्हणून लावलेल्या सोन्याच्या दोन दातांमुळेच आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. दोन सोन्याच्या दाताच्या माहितीवर रफी किडवाई मार्ग पोलिसांनी १५ वर्षापासून फरार असलेल्या प्रवीण आशुभा जडेजा उर्फ प्रवीणसिंह उर्फ प्रदीपसिंह आसुभा जडेजा (३८) याला बेड्या ठोकल्या आहेत. तो स्वतःची ओळख लपवून राहत होता. पोलिसांना त्याची माहिती मिळताच त्याला विम्याच्या रकमेचे आमीष दाखवून जाळ्यात ओढले आहे.हिंदमाता परिसरात कपडे विक्रीचा व्यवसाय करणारे तक्रारदार ए. एच. गंगर (४०) यांच्याकडे जडेजा हा १५ वर्षांपूर्वी कामाला होता. अन्य व्यापाऱ्यांकडे उसने असलेली रक्कम गंगर यांनी प्रवीणला आणण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी मिळालेल्या ४० हजार रुपयांवर त्याने डल्ला मारला. तसेच, शौचालयात कोणीतरी रक्कम असलेली पिशवी चोरल्याचा बनाव रचला. याप्रकरणी रफी किडवाई मार्ग पोलिसांनी भादंवि कलम ४०८ अंतर्गत गुन्हा नोंदवत  आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याच्या खटल्याच्या सुनावणीसाठी तो न्यायालयात हजर राहत नव्हता. अखेर दादर येथील न्यायालयाने त्याच्याविरोधात स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी करून त्याला फरार घोषित केले होते.गेल्या १५ वर्षांपासून जडेजा फरार होता. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश लामखडे, पोलीस हवालदार नारायण कदम, सुरेश कडलग, रवींद्र साबळे, महिला पोलीस शिपाई विद्या यादव व पोलीस शिपाई सुशांत बनकर यांनी तपासाला सुरूवात केली. जडेजा बाबत पोलिसांकडे जास्त माहिती नव्हती. फक्त  आरोपीचे पुढील दोन दात सोन्याचे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी हाच धागा पकडून तपास सुरू केला. 

त्याच्या आडनावावरून तो गुजरातमधील कच्छ येथील रहिवासी असल्याचा संशय होता. त्यामुळे पोलिसांनी हातातील माहितीच्या आधारे सर्च ऑपरेशन सुरू केले. अखेर, खबऱ्याकडून सोन्याचे दात, वयोगट, कामधंदा या गोष्टींशी मिळताजुळती व्यक्ती तेथे असल्याचे निष्पन्न होताच पथकाने सापळा रचला.संशियाताशी संपर्क साधून विम्याचे पैसे घेण्यासाठी मुंबईत बोलावले. पैशांसाठी मुंबईत येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. तेव्हा, तो प्रवीणच असल्याचे स्पष्ट होताच त्याला अटक करण्यात आली. नावाची हेराफेरीविशेष म्हणजे आरोपीने पोलिसांना चकवा देण्यासाठी  प्रवीणऐवजी प्रदीपसिंह असे नाव बदलले होते. त्याने आणखीन कुणाला फसवले आहे का? याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.