शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती कारागृहातून पसार झालेल्या आरोपीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 19:58 IST

Crime News : आरोपी सांगवामेळ येथे असल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांना मिळाली असता सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली.

मूर्तिजापूर :  ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्या सांगवामेळ येथील आरोपी खुनाच्या गुन्ह्यात अमरावती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना ३१ अॉगष्ट रोजी पळाला होता. या आरोपीस ग्रामीण पोलीसांनी ११ सप्टेंबर रोजी शिताफीने अटक करुन फेजरपूरा पोलीसांच्या हवाली केले.          सांगवामेळ येथील संतोष श्रीराम सोळंके (३०) हा ३० जुन २०१४ पासून अमरावती येथील खुल्या कारागृह खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना तो ३१ अॉगष्ट २०२१ रोजी कारागृहातून पळून गेला होता. यासंदर्भात तुरंग रक्षक नारायण रामचंद्र चवरे यांनी फेजरपूरा पोलीस स्टेशन अमरावती येथे तक्रार दाखल केली होती. कारागृहातून पळून आलेला आरोपी सांगवामेळ येथे असल्याची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांना मिळाली असता सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई ठाणेदार गोविंद पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली हेड सुभाष उघडे, हेड कॉन्स्टेबल संजय शिंगणे, हेड कॉन्स्टेबल संजय खंडारे, पोलीस शिपाई गजानन सयाम, होमगार्ड सैनिक नितीन भगत, निलेश दहीकर यांनी पारपडली. कारवाई करुन सदर आरोपीस फेजरपूरा पोलीसांच्या सुपूर्द केले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती