शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
3
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
4
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
5
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
6
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
7
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
8
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
9
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
10
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
11
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
12
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
13
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
14
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
15
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
16
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
17
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
18
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
19
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
20
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...

खून का बदला खून...! हत्येच्या गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपी युवकाची हत्या

By सुरेंद्र राऊत | Updated: June 3, 2025 21:20 IST

खुनाच्या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी घटनास्थळीच उभी हाेती. या दुचाकीला नंबर प्लेट लावलेली नाही.

सुरेंद्र राऊत

यवतमाळ - वर्षभरापूर्वी कळंब चाैक परिसरात गाेळी झाडून एकाची हत्या झाली हाेती. या गुन्ह्यातील आराेपी पंधरा दिवसांपूर्वी जामीनावर कारागृहातून बाहेर आला. तेव्हापासूनच त्याच्यावर पाळत ठेवून खुनाचा बदल घेण्याचा प्रयत्न सुरू हाेता. मंगळवारी सायंकाळी संधी मिळताच, धारदार शस्त्राने वार करून त्या आराेपीची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे वर्दळीच्या चांदणी चाैक परिसरात खळबळ उडाली.

मनीष सागर शेंद्रे (२५ रा.रमाई पार्क क्र. २ यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. मनीषवर गाेळी झाडून एकाचा खून केल्याचा आराेप आहे. या गुन्ह्यात ताे जानेवारी २०२४ पासून कारागृहात हाेता. काही दिवसांपूर्वी ताे जामिनावर बाहेर आला. त्यावेळी पाेलिसांनी त्याला यवतमाळ शहरात राहू नकाे, तुझ्या जीवाला धाेका आहे, अशी सूचना दिली हाेती. त्यानंतरही मनीष यवतमाळातच फिरत हाेता.

मंगळवारी मनीष त्याची दुचाकी दुरुस्त करण्यासाठी यवतमाळ वनपरिक्षेत्र कार्यालयासमाेर असलेल्या मुन्नाच्या गॅरेजवर आला हाेता. त्याने तेथे दुचाकी दुरुस्तीला टाकली, याची टीप पाळतीवर असलेल्या मारेकऱ्यांना मिळाली. त्यावरून मारेकरी याच परिसरात दबा धरून हाेते. दुचाकी घेण्यासाठी मनीष तेथे पाेहाेचला असता, चाैघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला चढविला. मनीष शरीरावर अनेक घाव लागूनही त्यांच्या तावडीतून निसटला. मात्र, काही अंतर पुढे जाऊन आरएफओ कार्यालयाच्या फाटकासमाेर काेसळला. त्यानंतर, पुन्हा हल्लेखाेरांपैकी एकाने त्याच्यावर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून ताे ठार झाला की नाही, याची खात्री केली. नंतर हल्लेखाेर घटनास्थळावरून पसार झाले.

मारेकऱ्यांची दुचाकी लागली हाती

खुनाच्या गुन्ह्यात मारेकऱ्यांनी वापरलेली दुचाकी घटनास्थळीच उभी हाेती. या दुचाकीला नंबर प्लेट लावलेली नाही. मनीषची हत्या केल्यानंतर दुचाकी सुरू झाली नाही. काही अंतर त्यांनी लाेटत नेण्याचा प्रयत्न केला. नंतर तिथेच साेडून दिली. एका ऑटाेरिक्षाने हल्लेखाेर घटनास्थळावरून पसार झाल्याचा संशय आहे.

पाेलिसांची, बघ्यांची एकच गर्दीखुनाच्या घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी जमली हाेती. मुख्य परिसरातील घटना असल्याने अपर पाेलिस अधीक्षक पीयूष जगताप, एसडीपीओ दिनेश बैसाने, एलसीबी प्रमुख सतीश चवरे, शहर ठाणेदार रामकृष्ण जाधव, अवधूतवाडी ठाणेदार नरेश रणधीर यांनी घटनास्थळी भेट दिली. फाॅरेन्सिक पथकाने घटनास्थळावर भाैतिक पुराव्यांचा शाेध घेतला, तर दुसरीकडे सर्वच शाेधपथक आराेपींच्या मागावर फिरत हाेते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी