शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कार करुन आत्महत्येस प्रवृत्त केले, दहा वर्षांपासुन फरार असलेल्या आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2022 21:09 IST

गुन्हे शाखा, युनिट ३ ची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्क

नालासोपारा  :- पीडित तरुणीवर बलात्कार केल्यावर कोणाला काही सांगितल्यावर एमएमएस दाखवेल अशी धमकी देत शिवीगाळ मारहाण केली. पीडित तरुणीने अंगावर रॉकेल टाकून स्वतःला पेटवून घेतल्याने मयत झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून मागील १० वर्षांपासून फरार असणाऱ्या आरोपीला शनिवारी गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास व चौकशीसाठी आरोपीला नालासोपारा पोलिसांना ताबा देण्यात आला आहे. 

पोलीस आयुक्तालय हद्दीतील दाखल गंभीर गुन्हयातील पाहिजे व फरार आरोपीतांची शोध मोहिम राबविणेबाबत वरिष्ठांनी सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने कार्यवाही करीत असताना, १४ फेब्रुवारी ते २० एप्रिल २०१३ साली आरोपी सुलतान ऊर्फ राजा शेख याने १९ वर्षीय पीडित तरुणीला शीतपेयातून गुंगीकारक औषध पिण्यास देवुन ती बेशुध्द अवस्थेत असताना तिचेवर बलात्कार केला होता. त्यामुळे ती गरोदर राहिल्याने तिने सदरची माहिती आरोपीला सांगितले. आरोपीने तिला इतर कोणाला काही सांगितले तर तुझा एमएमएस सर्वांना दाखवेल अशी धमकी देवुन मारहाण व शिवीगाळी केली होती. सदर घटनेमुळे पीडित मुलीने भीतीपोटी अंगावर रॉकेल टाकुन स्व:तास पेटवुन घेतल्याने ती मयत झाली होती. नालासोपारा पोलिसांनी २२ एप्रिल २०१३ मध्ये वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून आरोपी फरार होता.

सदर गुन्हयातील आरोपीत सुलतान ऊर्फ राजा शेख (२९) याच्याबाबत गुन्हे शाखेच्या युनिट तीनच्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व माहितीच्या आधारे शोध घेवून शनिवारी ताब्यात घेतले. त्याचेकडे प्राथमिक तपास केला असता त्याने तो मागील ९ वर्षापासुन उत्तर प्रदेश व पश्चिम बंगाल येथे अस्तित्व लपवुन दडुुन राहत असल्याचे सांगितले. आरोपीला पुढील कारवाई करीता नालासोपारा पोलिसांना ताबा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी