शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

बड्या सपा नेत्याचा खास, ड्रग तस्करीप्रकरणी अबू आझमीला एनसीबीची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 14:18 IST

Drug Peddler NCB Action: अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात ३५वी अटक मेमध्ये करण्यात आली होती. यानंतर गोव्यात सफ्रान लकडावालाला गोवा एनसीबीने ८ जुलैला अटक केली होती.

अभिनेता सुशांतच्या कथित आत्महत्येनंतर अंमली पदार्थ तस्कर एनसीबीच्या रडारवर आले असून गेल्या वर्षभरात एनसीबीने राजकीय धेंडांच्या जावयापासून अनेक बड्या बड्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. सुशांतला मिळत असलेल्या अंमली पदार्थांची लिंक गोव्यापर्यंत लागली होती. आता अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी गोवा एनसीबीने सपा नेत्याचा जवळच्या व्यक्तीला नोटीस पाठविली आहे. (Abu Aslam Azmi summoned by Goa NCB today in connection with the drugs matter related to peddler Sufran Lakdawala who was arrested on 8th July. )

गोवा नार्कोटिक्स ब्युरोने (एनसीबी) शनिवारी अबू असलम आझमीला ड्रग पेडलर सफ्रान लकडावालाशी संबंधीत असल्याने चौकशीला बोलावले आहे. लकडावालाला गोवा एनसीबीने ८ जुलैला अटक केली होती. एनसीबीने याची माहिती दिली आहे. 

अबू असलम आझमी हा समाजवादी पार्टीच्या एका बड्या नेत्याचा खास आहे. अबू आझमीला २०१८ मध्ये देखील दिल्लीच्या स्पेशल सेलने ड्रग्ज प्रकरणी अटक केली होती. अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येशी निगडित ड्रग्ज प्रकरणात ३५वी अटक मे मध्ये करण्यात आली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) सर्वात मोठी कारवाई करत सुशांतचा रुममेट आणि महत्त्वाचा संशयित सिद्धार्थ पिठाणी याला हैद्राबादला बेड्या ठोकल्या. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सिद्धार्थ पिठाणी हा एक महत्त्वाचा संशयित होता. सिद्धार्थ गेल्या अनेक महिन्यांपासून फरार होता. त्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी तीन वेळा समन्स पाठवून चौकशीसाठी हजर राहायला सांगितलं होतं, मात्र एकदाही तो हजर झाला नाही. यामुळे एनसीबीचे अधिकारी त्याच्या मागावर होते. अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) गोवा येथून ड्रग्ज पेडलर हेमल शाह याला देखील सुशांत प्रकरणी अटक केली होती. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोgoaगोवा