शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

अबब... व्हेल माशाची तीन कोटींची उलटी; श्रीनगर पोलिसांनी दोघांना केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:30 IST

दाेन्ही आराेपींना २६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पाेलिस काेठडी ठोठावली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : उच्च प्रतीच्या अत्तर (सेंट) निर्मितीसाठी आवश्यक असलेली व्हेल माशाची उलटी तस्करीसाठी  आलेल्या  दोघांना पोलिसांनी अटक केली. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनमधील मुझमिल मझर सुभेदार (४५) आणि म्हसळा येथील शहजाद शब्बीर कादरी (४५) या दोघांना ठाण्याच्या श्रीनगर पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तीन कोटींची किमतीचे अंबरग्रीस अर्थात व्हेल माशाची उलटी जप्त केली, अशी माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. 

दाेन्ही आराेपींना २६ डिसेंबरपर्यंत न्यायालयाने पाेलिस काेठडी ठोठावली आहे. वागळे इस्टेट रोड क्रमांक  १६ येथे काही जण व्हेल माशाच्या  उलटीच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती  सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे यांना मिळाली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवराज बेंद्रे आदींच्या पथकाने वन विभागाचे वनपाल अशोक काटेस्कर यांच्या पथकाने यातील दोघा  संशयितांना सापळा लावून ताब्यात घेतले. त्यांची चौकशी सुरु आहे. 

वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हाn चौकशीमध्ये त्यांच्याकडून अंगझडतीमध्ये एका सॅकमध्ये पिवळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेली सुमारे तीन कोटी रुपये किमतीची  व्हेल माशाची उलटी होती. व्हेल माशाच्या वांतीचा (अंबर ग्रिस) मोठ्या आकाराचा तुकडा हा तपकिरी रंगाचा आहे. n वन्यजीव अधिनियमानुसार ते मृगयाचिन्ह असून ते अनुसूची एकमध्ये मोडते. याप्रकरणी श्रीनगर पोलिस  ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी व्हेलची ही वांती नेमकी कुठून आणली आणि ती कोणाला  विक्रीसाठी नेली जात होती. n त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत किंवा कसे?  याचा तपास सुरू असल्याचे श्रीनगर पोलिसांनी सांगितले.