शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

"माझे पप्पा आमदार...", पोलिसांनी पकडताच आप नेत्याच्या मुलाची दादागिरी; बाईक सोडून पळाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:32 IST

दिल्ली पोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या मुलाची बाईक जप्त केली आहे.

दिल्लीपोलिसांनी आम आदमी पक्षाचे आमदार अमानतुल्लाह खान यांच्या मुलाची बाईक जप्त केली आहे. पोलिसांनीआप आमदाराच्या मुलाला चुकीच्या बाजूने बाईक चालवल्याबद्दल थांबवलं होतं. जेव्हा मुलाकडे लायसन्स आणि आरसी मागितलं तेव्हा तो दोन्हीही गोष्टी दाखवू शकला नाही. त्याने पोलिसांना सांगितलं की, माझे पप्पा आमदार आहेत.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, प्रजासत्ताक दिनाच्या (२६ जानेवारी) पार्श्वभूमीवर, जामिया नगरचे एएसआय आणि एसएचओ त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पेट्रोलिंग करत होते. जेव्हा ते बाटला हाऊसमधील नफीस रोडवर पोहोचले तेव्हा बाईकवर असलेली दोन मुलं चुकीच्या बाजूने येताना दिसली. बाईकला मॉडिफाय सायलेन्सर बसवण्यात आला होता, जो खूप मोठा आवाज करत होता. मुलं हलगर्दीपणाने बाईक चालवत होती.

आमच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने आम्ही दोघांनाही थांबवलं आणि तपास सुरू केला. चौकशीदरम्यान, बाईक चालवणाऱ्या मुलाने स्वतःची ओळख आम आदमी पक्षाचे (आप) आमदार अमानतुल्लाह खान यांचा मुलगा असल्याचं सांगितलं. त्याने पोलिसांना म्हटलं की, आपचं चिन्ह असल्याने तुम्ही माझी बाईक थांबवली.  यावेळी मुलाने पोलिसांशीही गैरवर्तन केलं.

एएसआयने दोन्ही मुलांना त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी दाखवण्यास सांगितलं. बाईक चालवणाऱ्या मुलाने सांगितलं की, त्याला लायसन्स आणि आरसीची गरज नाही. कारण तो स्थानिक आमदार अमानतुल्लाह खान यांचा मुलगा आहे. त्यानंतर पोलिसांनी आमदाराला फोन केला. याच दरम्यान मुलगा बाईक खाली टाकून पळून गेला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.  

टॅग्स :AAPआपdelhiदिल्लीPoliceपोलिस