शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीचा नाद युवकाच्या जीवावर बेतला; फक्त एक चूक अन् डोक्याच्या चिंधड्या उडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2022 11:39 IST

या घटनेची माहिती मिळताच कुटुंब घटनास्थळी पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत युवकाला हॉस्पिटलला नेले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले.

धौलपूर - तुम्ही नेहमी पाहिलं असेल सोशल मीडियावर सेल्फी पोस्ट करण्याचं वेड अनेकांना असतं. त्यासाठी विविध फोटो काढण्याची हौस तरुणाईला असते. सेल्फी क्रेझ सध्याच्या युवकांमध्ये खूप आहे. एकीकडे फोनमध्ये नव्या तंत्रज्ञानासोबत फिचर्समध्ये अपडेट आले आहेत. बाजारात नवनवीन फिचर्स स्मार्टफोन उपलब्ध झाले आहेत. ज्याने सेल्फी घेण्यासाठी नवं तंत्रज्ञान विकसित केले आहे. परंतु याच सेल्फीच्या नादात काही जण स्वत:चा जीव धोक्यात घालत असल्याचंही समोर आलं आहे.

आज अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यात सेल्फी घेण्याचा नाद युवकाच्या जीवावर बेतला आहे. राजस्थानच्या धौलपूर येथील युवकाचा गोळी लागल्यानं मृत्यू झाला आहे. बंदुकीसोबत सेल्फी घेताना चुकून ट्रिगर दाबला गेल्यानं युवकाचा मृत्यू झाला आहे. १९ वर्षीय मुलासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेने युवकाच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. उमरेह गावात १९ वर्षीय विद्यार्थी बेकायदेशीर शस्त्रासोबत सेल्फी घेण्याच्या नादात जीव गमावला आहे.

युवकाचा गोळी लागून घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. घरच्यांनी गोळीचा आवाज ऐकल्यानंतर तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा युवक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. युवकाला हॉस्पिटलमध्ये नेले परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. मीडिया रिपोर्टनुसार, रविवारी १९ वर्षीय युवक सचिन शेतात त्याच्या मित्रांसोबत फिरायला गेला होता. तेव्हा त्याठिकाणी सेल्फी घेण्यासाठी युवकाने त्याच्याकडील अवैध शस्त्र काढलं आणि सेल्फी घ्यायला लागला. ज्यावेळी मृत व्यक्ती सचिन मोबाईलवरुन फोटो क्लिक करायला लागला तेव्हा त्याच्या दुसऱ्या हातातील ट्रिगर चुकीनं दाबला गेला ज्यामुळे गोळी थेट युवकाच्या डोक्यात घुसली.

गोळीनं युवकाच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या. या घटनेची माहिती मिळताच कुटुंब घटनास्थळी पोहचले त्यांनी जखमी अवस्थेत युवकाला हॉस्पिटलला नेले परंतु त्याठिकाणी डॉक्टरांनी सचिनला मृत घोषित केले. घटनेनंतर सचिनचा मृतदेह घेऊन कुटुंब घरी परतत होते तेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी रस्त्यातच पोलिसांनी मृतदेह अडवला आणि कुटुंबाची चौकशी केली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला. मृत युवक बीएच्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता.