शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

माथेफिरू युवकाचं संतापजनक कृत्य; भावी पत्नीवरच बलात्कार करून ठार केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 05:33 IST

कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला.

जालना - लग्न अवघे एका महिन्यावर आलेले असतानाच एका तरुणाने आपल्या होणाऱ्या  पत्नीचा बलात्कार करत गळा चिरून खून केला. मंठा तालुक्यातील बेलोरा गावात शनिवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दीप्ती उर्फ सपना संदीप जाधव (१७) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेनंतर खून करणारा तरुण फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. खुनाचे नेमेक कारण अद्याप समोर आलेले नाही.

बेलोरा गावातील दीप्ती उर्फ सपना संदीप जाधव (वय १७) हिचा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील सुशील सुभाष पवार या तरुणासोबत विवाह जुळला होता. येत्या १७ मार्च २०२३ रोजी विवाह असल्याने शनिवारी वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी दुसरबीड येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी गेले होते. यावेळी  सुशीलही बस्त्यासाठी नातेवाइकांसोबत आला होता. मात्र, तो अचानक गायब झाला. त्याने थेट बेलोरा हे गाव गाठले. कुटुंबीय बस्त्यासाठी गेल्याने घरी भावी नवरी दीप्ती ही एकटीच होती. तरुणाने तिच्यावर बलात्कार केला. तिने विरोध केला असता, त्याने धारदार शस्त्राने गळा चिरला. त्यामुळे ती जागीच गतप्राण झाली. घटनास्थळी गावातील लोक जमा होताच सुशील फरार झाला. या माथेफिरूने नेमके टोकाचे पाऊल उचलून होणाऱ्या सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या आपल्या भावी पत्नीचा खून का केला हे अद्याप समोर आलेले  नाही. 

शेवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल माहिती मिळताच परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, सेवली ठाण्याचे सहायक निरीक्षक नित्यानंद उबाळे हे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठवला. घटनास्थळी ग्रामस्थ आक्रमक झाल्याने तणाव निर्माण झाला होता. मारेकरी सुशील पवार यास अटक करण्याच्या मागणीसाठी जमावाने संशयित तरुणाच्या आईवडिलांसह नातेवाइकांना बेलोरा येथील एका घरात कोंडले आहे. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.