शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अंगावर शहारे आणणारी घटना, बर्थ डे पार्टीतच दिव्यांगाने चाकू भोसकून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 20:32 IST

राजूने छेदा लालचे २ पाय पकडले आणि त्याला खाली पाडले त्यानंतर त्याच्या पोटावर सलग चाकूचे ६ वार केले.

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर इथं एक बर्थ डे पार्टी गावातील एका व्यक्तीचं मृत्यूचं कारण बनली आहे. ज्या व्यक्तीनं ही हत्या केली तो पायाने दिव्यांग आहे. या दिव्यांगाने किरकोळ कारणावरून एका व्यक्तीची चाकू भोसकून त्याची हत्या केली. त्याने एकाचवेळी व्यक्तीच्या पोटावर ६ वेळा चाकूने वार केले. त्यामुळे रक्तबंबाळ झालेला तो व्यक्ती तिथेच खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. या हत्येनंतर आरोपी दिव्यांग तिथून फरार झाला. 

गावात सुरू होती बर्थ डे पार्टीहत्येची खळबळजनक घटना शाहजहापुरच्या कटरा परिसरात घडली आहे. ज्याठिकाणी गुरुवारी रात्री गावात राहणाऱ्या राजवीरच्या मुलाचा वाढदिवस होता. घरात सगळे पाहुणे आले होते. बर्थ डे पार्टी सुरू होती. घराबाहेर मैदानात जेवणाची सोय केली होती. त्याठिकाणी राजवीरचा शेजारी छेदा लाल कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्यांची विचारपूस करत होते. 

त्यावेळी गावात राहणारा दिव्यांग राजू त्याची ई रिक्षा घेऊन तिथे पोहचला. त्याला तिथून जायचे होते परंतु लोकांच्या गर्दीमुळे त्याला बळजबरीने रिक्षा काढण्याचा प्रयत्न करावा लागला. त्यामुळे छेदा लालने काही वेळ थांबण्यास सांगितले. याच गोष्टीने संतापलेला राजूनं छेदा लालसोबत वाद घातला. त्यावरून दोघांमध्ये झटापट झाली. त्यात रागाच्या भरात राजूने सलाद कापणाऱ्या वेटरकडून चाकू हिसकावून घेतला. 

राजूने छेदा लालचे २ पाय पकडले आणि त्याला खाली पाडले त्यानंतर त्याच्या पोटावर सलग चाकूचे ६ वार केले. त्याने इतक्या जोरात हे वार केले त्याने छेदालाल रक्तबंबाळ अवस्थेत पडला. अंगावर थरकाप उडवणारी घटना पाहून पार्टीत आलेल्या लोकांमध्ये गोंधळ माजला. मुलं घाबरली आणि त्याचाच फायदा घेत राजू तिथून पळाला. डॉक्टरांनी छेदा लालला मृत घोषित केला असून या संबंधात पोलीस तपास करत आहे. 

आरोपीला पोलिसांनी केली अटकशुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी राजूला बेड्या ठोकल्या. जेव्हा पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा त्याने गुन्हा कबूल केला. आता पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत. छेदा लाल आणि राजू यांच्यात यापूर्वी काही वाद झाला होता का? की राजूने रागाच्या भरात हे कृत्य केले याचा पोलीस शोध घेत आहेत.