शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आई म्हणाली देवाघरी जायचे...! चिमुकल्यासह घेतली उडी; थोडक्यात वाचला मुलाचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2022 05:23 IST

आईनं कवटाळल्यामुळे वाचले मुलाचे प्राण, त्रास देणारा पती अटकेत

नवी मुंबई : पाच वर्षांच्या मुलासह आईने सात मजली इमारतीच्या छतावरून उडी मारल्याची घटना कोपरखैरणे घडली. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असून आत्महत्या करताना तिने मुलाला कवटाळून धरल्याने त्याचे प्राण वाचले. सासरच्या सततच्या त्रासाला कंटाळून महिलेने हे कृत्य केले असून याप्रकरणी तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.

कोपरखैरणे सेक्टर २० येथील न्यू रावची इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. त्याठिकाणी आरती मल्होत्रा (३९) ही पती विजेंद्र मल्होत्रा, सासू किरण, नणंद अंजली यांच्यासह राहायला होती. २०१६ मध्ये तिचे लग्न विजेंद्रसोबत झाले होते. लग्नानंतर तिचा सतत छळ सुरू होता. यामुळे वर्षभरापूर्वीदेखील तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी भावाने समजून काढत तिला धीर दिला होता. अखेर सोमवारी तिने पाच वर्षांचा मुलगा अर्विक याला कवटाळून सात मजली इमारतीच्या छतावरून उडी मारली. 

त्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला असून मुलगा थोडक्यात बचावला आहे. त्याच्या चेहऱ्याला व पायाला दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सासरच्यांकडून छोट्या छोट्या कारणावरून आरतीचा छळ केला जात होता. तिला माहेरच्या व्यक्तींना भेटण्यासही मनाई केली जायची. तर लॉकडाऊनपासून घरूनच काम करणारी नणंददेखील सासू-सुनेत भांडणाची ठिणगी टाकत होती. आरतीने अनेकदा आई व भावाकडे वाच्यता केली होती. त्यामुळे तिच्या आत्महत्येनंतर भाऊ विशाल शर्मा याने बहिणीच्या सासरच्यांविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे सोमवारी रात्री सासरच्यांवर गुन्हा दाखल करून पती विजेंद्रला अटक केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय भोसले यांनी सांगितले.

आई म्हणाली देवाघरी जायचे...

सात मजली इमारतीवरून पडूनही सुदैवाने पाच वर्षांच्या अर्विकचे प्राण वाचले आहेत. उपचारादरम्यान मामा त्याच्या भेटीसाठी गेला असता त्याने ‘आई रडत होती, म्हणाली देवाघरी जायचे...आणि आम्ही इमारतीवरून उडी मारली’ असे सांगितले. परंतु, उडी मारताना त्याला आईने कवटाळले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यामुळे जमिनीवर पडताना तो आईच्या अंगावर पडून थोडक्यात त्याचे प्राण वाचले. मात्र, मृत्यूला स्पर्श करून येणाऱ्या या घटनेमुळे त्यालाही मानसिक धक्का बसला आहे.