शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'‘महिलेचे कपडे उत्तेजक असल्यास लैंगिक छळाचा आरोप करता येणार नाही’'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 07:33 IST

या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते व लेखक सिव्हिक चंद्रन (७४ वर्षे) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. 

तिरुवनंतपुरम : महिलेने लैंगिक भावना उत्तेजित करणारे कपडे परिधान केले असतील तर अशा प्रकरणात एखाद्यावर लैंगिक छळाचा आरोप प्रथमदर्शनी करता येणार नाही, असा निकाल एका प्रकरणात केरळच्यान्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते व लेखक सिव्हिक चंद्रन (७४ वर्षे) यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. 

कोडिकोळ येथील जिल्हा सत्र न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याचा आरोपीचा हेतू होता हे सिद्ध व्हायला हवे, असे भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४मध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे.  सिव्हिक चंद्रन यांना लैंगिक छळाच्या प्रकरणात १२ ऑगस्ट रोजी न्यायालयाने जामीन मंजूर केला. विनयभंग करण्याचा सिव्हिक चंद्रन यांचा हेतू होता असे भारतीय दंड संहितेच्या ३५४(ए) कलमातील तरतुदींनुसार प्रथमदर्शनी म्हणता येत नाही. 

महिला तक्रारदाराची काही छायाचित्रे चंद्रन यांनी न्यायालयाला सादर केली. आणखी एका लैंगिक छळाच्या प्रकरणात चंद्रन यांना २ ऑगस्ट रोजी अटकपूर्व जामीन मिळाला होता. महिलेच्या छायाचित्रांचा संदर्भ देत कोडिकोळ जिल्हा न्यायालयाने म्हटले आहे की, तक्रारदार महिलेने परिधान केलेले कपडे लैंगिक भावनांना उत्तेजन देणारे होते. त्यामुळे या महिलेचा विनयभंग करण्याचा सिव्हिक चंद्रन यांचा हेतू होता, असे प्रथमदर्शनी म्हणता येणार नाही. आरोपीने महिलेला स्पर्श केला असेल किंवा लैंगिक सुखाच्या हेतूने काही कृती, संभाषण केले असेल तरच त्याचा विनयभंग करण्याचा हेतू होता असे म्हणता येईल. (वृत्तसंस्था)

खोटी तक्रार दाखल केल्याचा दावा 

आपल्या विरोधात महिलेने खोटी तक्रार दाखल केली आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्ते सिव्हिक चंद्रन यांनी न्यायालयात केला होता. एका समारंभात पीडित महिला माझ्याशी बोलायला आली होती. त्यावेळी तिथे अनेक जण उपस्थित होते. इतर कोणीही माझ्यावर लैंगिक छळाचा आरोप केला नाही. फक्त या महिलेनेच तसा आरोप केला असा युक्तिवाद सिव्हिक चंद्रन यांच्या वतीने वकिलांनी केला.

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालय