शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पती-पत्नीच्या वादात पाच महिन्यांच्या बाळाची हत्या करून टाकले विहिरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 12:03 IST

सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहत असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते.

कोपरगाव (जि. अहमदनगर) : पती-पत्नीच्या वादात आपल्या पाच महिन्यांच्या बाळाची आईनेच मारहाण करत गळा दाबून हत्या केली. त्यानंतर बाळाचा मृतदेह विहिरीत टाकला. दोन अज्ञात इसमांनी बाळाला पळवून  नेल्याचा बनाव बाळाच्या आईने केला होता. मात्र, पोलिसांनी घेतलेल्या संशयामुळे आईनेच बाळाची हत्या केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पत्नीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

सूरज आणि गायत्री माळी हे दाम्पत्य कोपरगाव तालुक्यातील कारवाडी शिवारात राहत असून, मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. पती सूरज हा पत्नी गायत्रीवर अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत असल्याने  दोघांमध्ये वाद व्हायचे. या वादातूनच गायत्रीने रागाच्या भरात आपल्या शिवम नावाच्या पाच महिने सात दिवसांच्या बाळाला मारहाण करून गळा आवळून खून केला. बाळाचा मृतदेह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत फेकून दिला. काही अज्ञात लोकांनी येऊन मुलाला पळवून नेल्याचा बनाव केला. पोलिसांना बाळाची आई गायत्रीवर संशय आला. त्यादृष्टीने तपास केला असता तिने घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला. रोजच्या भांडणाच्या कारणावरून रागाच्या भरात स्वतःच्या बाळाला मारहाण करून गळा दाबून हत्या केल्याचे तिने सांगितले.