शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
2
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
3
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
4
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
5
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
6
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
7
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
8
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
9
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
10
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
11
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
12
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
13
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
14
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
15
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
16
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
17
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
18
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
19
Maharashtra Rain: जून महिन्यात धो-धो; जुलैत पावसाला ब्रेक! 
20
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…

'माझ्या प्रायव्हेट पार्टला कोणीतरी...'; महिलेने सांगितला ऑपरेशन थिएटरमधील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 20:16 IST

कोलकाता येथील एका रुग्णालयात ऑपरेशननंतर एका महिला रुग्णाने विनयभंगाचा आरोप केला आहे.

कोलकाता येथील एका सुप्रसिद्ध सुपर स्पेशालिटी रुग्णालयात ऑपरेशननंतर एका महिला रुग्णाने विनयभंगाचा आरोप केला आहे. पीडितेचा आरोप रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यावर असून, त्यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे.

रुग्णाने दावा केला आहे की, त्याला ४ जानेवारी रोजी कोलकाता येथील फूलबागान पोलीस स्टेशन परिसरातील एका प्रसिद्ध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे ५ जानेवारीला सकाळी त्यांना पित्ताशयावरील शस्त्रक्रियेसाठी ऑपरेशन थिएटर येथे नेण्यात आले. त्यानंतर सकाळी ९ वाजता भूल देण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर सकाळी ११ ते १२ वाजताच्या दरम्यान मी शुद्धीत होते, पण भूल दिल्याने मला हालचाल करता आली नाही. यादरम्यान मला असे वाटले की कोणीतरी माझ्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करत आहे.

जिथे ऑइलची पाइपलाइन तिकडे तो भाड्याने घ्यायचा पत्र्याचा शेड; ४०० कोटी कमावले, शेवटी बिंग फुटलं!

पीडित महिलेने सांगितले की, "माझ्या उजव्या बाजूला उभ्या असलेलं कोणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होते. ते मला असह्य झाले होते. त्यानंतर मी हळूहळू शुद्धीवर येत होते. यादरम्यान मला जाणवले की मला खूप वाईट पद्धतीने स्पर्श केला जात आहे. मला सर्व काही जाणवत होते. मला ते थांबवता आले नाही, कारण मी पूर्णपणे शुद्धीत आली नव्हती. मात्र थोड्यावेळेनंतर जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मला माझ्या प्रायव्हेट पार्टवर एक खूण दिसली."

पीडित महिलेचे म्हणणे आहे की, जेव्हा तिच्यासोबत हा प्रकार घडला तेव्हा तेथे एकही महिला कर्मचारी नव्हती. पीडितेने सांगितले की, "ऑपरेशन थिएटरमध्ये माझ्यासोबत काय झाले हे मला माहीत नाही, परंतु माझ्या छातीच्या उजव्या बाजूला देखील स्पर्शाच्या खुणा आहेत ज्या स्पष्टपणे दिसत आहेत."

आशियातील सर्वात श्रीमंत गाव भारतात; वर्षभर एकच फळ विकतात, डायरेक्ट करोडपती बनतात

आरोपींना शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा-

रुग्णाचे म्हणणे आहे की, तब्येत थोडी सुधारल्यानंतर तिने लगेचच हा सर्व प्रकार त्याच्या सल्लागार डॉक्टरांना सांगितला. यानंतर रुग्णालय व्यवस्थापनासमोर हे प्रकरण मांडले असता तेथील अधिकाऱ्यांनी माफी मागितली, पण मला न्याय हवा आहे. आरोपींना शिक्षा व्हावी अशी माझी इच्छा असल्याचं पीडित रुग्णाने सांगितले.

पोलीस काय म्हणाले पाहा...

पीडितेच्या तक्रारीवरून कोलकाता पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. यासोबतच त्यांची वैद्यकीय चाचणीही करण्यात आली आहे. याप्रकरणी डीसीपी प्रियव्रत रॉय यांनी सांगितले की, महिलेने केलेल्या आरोपावरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 354 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी रूग्णालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, एका रूग्णाने कर्मचार्‍यांवर विनयभंगाचा आरोप केला आहे. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपास सुरू आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेला आमचे प्राधान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळdocterडॉक्टर