शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

बारलोणीत बंद घर दिवसा फोडले; दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारला

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 15, 2023 18:47 IST

दोन्ही घराची कुलपं तोडलेली दिसली. घरात डोकावले असता दोन लोखंडी कपाटे, लाकडी कपाट व बेडचे फर्निचरचे कप्पे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते.

सोलापूर : दिवसा ढवळ्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास पाच लाखांचा ऐवज चोरून नेला.ही घटना गुरुवार, १३ एप्रिल रोजी सकाळी १० ते दु.२.३० सुमारास माढा तालुक्यात बारलोणी येथे घडली. याबाबत अभिमान गजराव मोरे (रा.बारलोणी ता.माढा) यांनी फिर्याद दिली आहे.

 पोलीस सूत्राकडील माहितीनुसार फिर्यादी मोरे यांची काशीद वस्ती आणि बारलोणीत घराशेजारी अशा दोन ठिकाणी शेती आहे. गुरुवार सकाळी ८ वाजता अभिमान माेरे आणि त्यांची पत्नी शारदा व मुलगा सुमीत हे तिघेजण काशीद वस्ती येथील शेतात उसाची लागन चालू असल्याने तिथे गेले होते.

 अभिमान यांच्या आई पार्वती या घराशेजारील शेतात खुरपणीसाठी आलेल्या महिला मजुरांसोबत होत्या. मात्र, घरी कोणीच नसल्याने कुलपं लावली होती. दरम्यान कामाला लावलेल्या महिलांची जेवणाची सुट्टी झाल्यानंतर फिर्यादीच्या आई घराकडे जनावरांना पाणी पाजण्यासाठी आल्या असता त्यांना दोन्ही घराची कुलूपं तोडलेली दिसली.हे पाहून आईने दुपारी अभिमान यांना फोन करुन याची माहिती दिली. फिर्यादी, त्यांची पत्नी व मुलगा यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दोन्ही घराची कुलपं तोडलेली दिसली. घरात डोकावले असता दोन लोखंडी कपाटे, लाकडी कपाट व बेडचे फर्निचरचे कप्पे उघडून त्यातील सामान अस्ताव्यस्त टाकलेले होते. शेतीच्या कामाकरीता बँकेतून काढुन आणून कपाटात ठवेलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

या घटनेनंतर श्वान पथक, ठसे तज्ज्ञ यांना पाचारण करण्यात आले. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, उपविभागीय पोलिस अधिकारी डाॅ.विशाल हिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.अधिक तपास पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत.अंगठ्या, लॉकेट गंठणवर डल्ला रोख रक्कम १ लाख १५ हजार, १ लाख ६० हजार रुपये किमतीचे चार तोळे सोन्याच्या बांगड्या, १ लाख २० हजारांचे तीन सोन्याचे लाॅकेट, ८० हजारांचे दोन तोळे सोन्याचे गंठण, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असे एकूण ४ लाख ९५ हजार रुपयांचे ऐवज लंपास झाला आहे.

टॅग्स :theftचोरी