शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइल फोडल्याच्या रागातून बालकाचे वडापावचे आमिष दाखवून अपहरण

By उद्धव गोडसे | Updated: August 1, 2023 21:38 IST

संशयितास १८ तासात अटक, बालकाची सुखरुप सुटका

उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: बांधकामावर काम करणा-या सहका-याने मोबाइल फोडल्याच्या रागातून त्याच्या तीन वर्षीय बालकाला वडापावचे आमिष दाखवून अपहरण करणा-या संशयितास पोलिसांनी १८ तासात पकडून बालकाची सुखरूप सुटका केली. मानतेश उर्फ संजू बसलिंगाप्पा व्हारांटे (वय ३३, रा. सुंदोळे, ता. गोकाक, जि. बेळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. व्हारांटे याला पोलिसांनी मंगळवारी (दि. १) सकाळी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून अटक केली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क-याप्पा सिद्धाप्पा मळगली (सध्या रा. महालक्ष्मी पार्क, संदीप बेकरीजवळ, रामानंदनगर, कोल्हापूर) यांचा तीनवर्षीय मुलगा रायाप्पा हा सोमवारी (दि. ३१) सायंकाळी अचानक घरातून बेपत्ता झाला. आसपास शोध घेऊनही तो सापडत नसल्याने अखेर क-याप्पा यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपास करण्याच्या सूचना दिल्या.

संशयित अपहरणकर्ता मानतेश हा मंगळवारी सकाळी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. गोकाकहून कोल्हापूरला आलेल्या बसमधून उतरताच मानतेश याला बालकासह ताब्यात घेतले. अधिक चौकशीत त्याने क-याप्पा याने मोबाइल फोडल्याच्या रागातून त्याच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली दिली. उपनिरीक्षक शेष मोरे यांच्यासह राम कोळी, दीपक घोरपडे, सागर माने, संजय कुंभार, प्रीतम मिठारी, सागर डोंगरे, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Arrestअटक