शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मूळ मालकाची गाडी परस्पर विकून चार लाखांची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: August 2, 2023 16:37 IST

पवार यांना गाडी आवडली व त्याचा ४ लाखात सौदा ठरला . मात्र गाडीचे मूळ आरसी बुक नसल्याने ते दहा दिवसात आणून देतो असे चाळकेने सांगितले.

मीरारोड - परस्पर गाडीची ४ लाखांना विक्री करून खरेदीदाराची फसवणूक करणाऱ्या गोरेगावच्या कार डीलर वर मीरारोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मीरारोडच्या शांतिपार्क मधील युनिक क्लस्टर मध्ये राहणारे विनोद पवार यांना जुनी कार खरेदी करायची असल्याने मित्र अमोल रांजणे व त्याच्या माध्यमातून ओळखीचा कार डीलर भूषण चुरी रा . विरार यांना सांगितले होते . चुरी  याच्या माध्यमातून विशाल  विलास चाळके (४०) रा . म्हाडा वसाहत , राम मंदिर , गोरेगाव पश्चिम हा कार डीलर त्याच्या कडील गाडी घेऊन मीरारोड येथे डिसेम्बर २०२२ मध्ये आला होता. 

पवार यांना गाडी आवडली व त्याचा ४ लाखात सौदा ठरला . मात्र गाडीचे मूळ आरसी बुक नसल्याने ते दहा दिवसात आणून देतो असे चाळकेने सांगितले. मित्र अमोल रांजणे समक्ष पवार यांनी चाळके याला ४ लाख रोख दिले .  चाळके याने कोऱ्या कागदावर गाडी विक्री केल्याचे लिहून घेतले व त्या नंतर गाडी, बँकेची नाहरकत व आरसी बुक ची छायांकित प्रत पवार यांच्या कडे दिली . मूळ आरसी बुक आणून द्या व गाडफी नावावर करून द्या म्हणून पवार यांनी चाळके कडे कडे पाठपुरावा चालवला होता . मात्र तो टाळाटाळ करत होता .  दरम्यान ८ जून २०२३ रोजी गाडीचे मूळ मालक भगवानराव तकारखेडे हे त्यांच्या सहकाऱ्यां सह येऊन त्यांच्या कडील चावीने गाडी घेऊन गेले . पवार यांनी सदर प्रकार चाळके ह्याला सांगितल्यावर त्याने पैसे परत करतो असे आश्वासन दिले . मात्र तो पैसे परत करत नसल्याने १ ऑगस्ट रोजी मीरारोड पोलीस ठाण्यात चाळके विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .