शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला विकणाऱ्या बापावर गुन्हा दाखल

By धीरज परब | Updated: September 8, 2022 13:41 IST

मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला बनावट कागदपत्रे बनवून विकणाऱ्या बापा सह त्याच्या साथीदारा विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

मीरारोड -  

मुलीच्या मालकीची सदनिका सावत्र आईला बनावट कागदपत्रे बनवून विकणाऱ्या बापा सह त्याच्या साथीदारा विरुद्ध मीरारोडच्या नया नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . 

दिव्या बलाणी हिच्या वतीने वकील सुनील सोनकर यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार , मीरारोडच्या ब्रॉडवे एव्हेन्यू मध्ये महिमा बलाणी यांची असलेली सदनिका त्यांच्या निधन नंतर पती अविनाश ह्याने ३० लाखांना विकली होती . त्यातील ५० टक्के हिस्सा हा अविनाश व ५० टक्के हिस्सा मुलगी दिव्या हीचा होता . अविनाशने स्वतःचे कर्ज व देणी यात १५ लाख खर्च केले तर उर्वरित १५ लाखातून शांती नगर सेक्टर ६ मधील दीपक इमारतीत २०१ क्रमांकाची सदनिका स्वतःचे नावे खरेदी केली . दरम्यान अविनाश ह्याने डॉली उर्फ प्रिया नावाच्या महिलेशी दुसरा विवाह केला पण २ वर्षांनी त्यांच्या बेबनाव होऊन तिने कौटुंबिक हिंसाचार नुसार फौजदारी कारवाई सुरु केली .  

नालासोपाराच्या शक्कर मोहल्ला येथे राहणारा अशिक शेख याने त्यावेळी अल्पवयीन असलेल्या दिव्या साठी २०१७ सालात न्यायालयातील भरणपोषण दाव्यासाठी वकील सोनकर यांची नियुक्ती केली होती . २०१७ साली दिव्या हिने वडिलांना पाठवलेल्या नोटीस नंतर वडिलांनी ती सदनिका दिव्या हिच्या ५० टक्के हिश्यातून भविष्यातील तिचे शिक्षण , मूलभूत गरज  , विवाह आदी साठी आर्थिक तजवीज म्हणून खरेदी केली होती . तसे चुकदुरुस्ती दस्त सुद्धा अविनाश यांनी नोंदणी करून दिले होते. 

दरम्यान अविनाश व डॉली मध्ये समझोता होऊन दीपक इमारतीतच ३०१ क्रमांकाची सदनिका डॉली यांना देण्याचे अविनाश याने मान्य केले . परंतु अविनाश ने दिव्या हिची २०१ क्रमांकाची सदनिका डॉली हिला १० लाखांना विक्रीचे दस्त नोंदणी करून घेतले . गृहनिर्माण संस्थेत ती सदनिका डॉली यांच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी वकील राजेशकुमार मिश्रा यांनी दिव्या व अशिक शेख मार्फत नाहरकत पत्र अविनाशच्या संगनमताने दिले.  खोटी कागदपत्रे, खोटे पुरावे व कट करून फसवणूक केल्या प्रकरणी नया नगर पोलिसांनी ३ सप्टेंबर रोजी अविनाश सह शेख वर गुन्हा दाखल केला आहे .

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर