शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

वकिलाच्या १४ लाखांच्या फीचा धनादेश हिसकावल्या प्रकरणी बाप-लेकावर गुन्हा दाखल 

By धीरज परब | Updated: June 27, 2023 17:36 IST

मीरारोडच्या अंतरिक्ष टॉवर मध्ये राहणाऱ्या ऍड . वंदना जाधव - बोदडे जुबेर खान व हार्दिक सेठ त्यांचे प्रकरण घेऊन आले होते.

मीरारोड - कायदेशीर कचाट्यात असलेली सदनिका सोडवून देण्यासाठी २० लाखांची फी महिला वकिलाची ठरली असताना त्यातील १४ लाखांचा धनादेश वकिलाच्या पती कडून हिसकावून घेतल्या प्रकरणी  भाईंदरच्या नवघर पोलीस ठाण्यात बाप - लेका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 

मीरारोडच्या अंतरिक्ष टॉवर मध्ये राहणाऱ्या ऍड . वंदना जाधव - बोदडे जुबेर खान व हार्दिक सेठ त्यांचे प्रकरण घेऊन आले होते. सराईत भामटा असलेल्या योगेश कारंडे याने शांती नगर सेक्टर १, अमिषा शांती मधली सदनिका त्या दोघांना विकून फसवणूक केल्याचे व सदनिका न्यायालयाच्या आदेशा नुसार पोलिसांच्या ताब्यात असल्याचे सांगितले . ऍड . वंदना यांनी न्यायालयात याचिका करून सदनिका मिळवण्याची कार्यवाही नाही १० लाख रुपयांची फी सांगितली . दरम्यान ऍड . वंदना यांचे पती शरद बोदडे यांचा मित्र  रामसजीवन राजनंदन सिंग याने ती सदनिका विकत घेण्याची तयारी दर्शवली. खान व सेठ यांनी त्यांची सदनिका सिंग याना ६५ लाख रुपयांना विकण्याचे समझपत्र केले . त्या ६५ लाखात २० लाख रुपये ऍड . वंदना यांची फी ठरली . डिसेम्बर २०१९ मध्ये त्यांच्यात नोंदणीकृत करारनामा झाला त्यात सदनिकेची किंमत ४९ लाख ७५ हजार नमूद केली.  

सिंग याने ४ लाख फी दिल्यावर ऍड . वंदना यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली व मार्च २०२३ मध्ये उच्च न्यायालयाने सिंग यांचे बाजुने निकाल दिला . त्या नंतर मात्र सिंग याने सदनिकेच्या मुळ मालकांना दयावयाची खरेदी रक्कम व ऍड . वंदना यांनी उर्वरीत १६ लाखांची फी देण्यास टाळाटाळ चालवली . एप्रिल मध्ये सिंग याने १ लाख रोख व १४ लाखांचा धनादेश ऍड . वंदना याना दिला . मे मध्ये सिंग याने गृहनिर्माण संस्था रजिस्टारकडे चाललेली याचिका ऍड . वंदना यांच्या कडून काढून दुसऱ्या वकिलास द्यायचे सांगितले . त्यावर आपली उर्वरित फी दिल्यावर दुसरा वकील करा असे ऍड . वंदना यांनी सांगितले. 

सिंग याने सव्वातीन लाख दिल्या नंतर सिंग व त्याची पत्नी फलकमारी, मुलगा मनिष व उमेश हर्षवाल  यांनी ऍड . वंदना यांच्या घरी जाऊन ते परत मागून घेतले व त्या बदल्यात त्यांना धनादेश दिला. सिंग याने ऍड . वंदना यांना संदेश पाठवून तुमचे पैसे रोखीने देतो , तुम्हाला दिलेले १४ लाख व सव्वातीन लाखांचे धनादेश माझ्या कार्यालयात आणून द्या असे सांगितले. त्यानुसार पती शरद बोदडे हे भाईंदर पूर्वेला रेल्वे स्थानक समोरील सिंग याच्या कार्यालयात दोन्ही धनादेश देऊन गेले. त्यावेळी बोदडे व सिंग आणि त्यांचा मुलगा मनिष यांच्यात बोलाचाली होऊन वाद झाला . त्यावेळी सिंग व मनीष याने १४ लाख रुपयांचा धनादेश बोदडे यांच्या कडून जबरीने हिसकावून घेत मारहाण केली म्हणून ऍड . वंदना जाधव यांच्या फिर्यादी नुसार २३ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर