शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वारसांना अंधारात ठेवून भूखंड हडपणाऱ्यां विरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 20:17 IST

जेएनपीटी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत गैरव्यवहाराचा प्रकार

उरण: आप्तस्वकीय असलेल्या वारसांना अंधारात ठेवून जेएनपीटी साडेबारा टक्के योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपये किमतीचे भुखंड परस्पर हडप करु पाहाणाऱ्या काका, आत्या,पुतणी- पुतणे आणि त्यांना साथ देण्यासाठी खोटे दाखले देऊन मदत केल्या प्रकरणी तत्कालीन जसखार ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, उरण गटविकास अधिकारी व साडेबारा टक्के भूखंड योजनेच्या फाईल हाताळणारे तत्कालीन जेएनपीटी, सिडको अधिकारी यांच्या  विरोधातच पुतण्याने पोलिसांत धाव घेतली आहे. पुतण्याच्या तक्रारींनंतर अखेर चाढकलपणा करणाऱ्या  न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी शासकीय अधिकाऱ्यांसह १० आरोपींवर गुन्हा दाखल केल्यानंतर उरण परिसरात खळबळ माजली आहे.

उरण तालुक्यातील जसखार येथील धनंजय आत्माराम ठाकूर यांची वडिलोपार्जित जमीन आहे.ही जमीन सिडकोने जेएनपीटी बंदर उभारण्यासाठी संपादन केली आहे.या संपादन करण्यात आलेल्या जमीनपोटी जेएनपीटी, सिडकोच्या साडेबारा योजनेअंतर्गत भुखंड देण्याची तयारी सुरू केली आहे.या जमिनीला कायद्याने सहा वारस आहेत. यापैकी धनंजय ठाकूर व इतर दोन वारसांचा मृत्यू झाला आहे.असे असतानाही विजय ठाकूर, मधुकर ठाकूर,विना पाटील, सुमती म्हात्रे, कुसुमावती पाटील आदी काका,आत्या,पुतणी- पुतणे आदींनी इतर वारसांना अंधारात ठेवून जमिनीची फाईल जेएनपीटी मार्फत सिडकोमध्ये जमा केली आहे. या फाईलमध्ये खोटी कागदपत्रे, मयत धनंजय आत्माराम ठाकूर यांच्या खोट्या सह्या, न्यायालयीन कागदपत्राचा खोट्या अर्थाने वापर करण्यात आला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या फाईलमध्ये दोन मयत व्यक्तींना हयात दाखविलेले आहेत.

जसखार ग्रामपंचायतीने वास्तव्य करीत नसलेल्या सहा व्यक्तींच्या नावे जसखार गावचे कायमचे रहिवासी असल्याचे एकत्रित रहिवाशी दाखले जसखार ग्रामपंचायतीने दिले आहेत.या रहिवासी दाखल्यात दोन हयात नसलेल्या व्यक्तींची नावे आहेत. आप्तस्वकीयांनीच केलेल्या या गंभीर बाबींची पुतण्या शिरीष ठाकूर यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सिडको, जेएनपीटीकडे तक्रार केली.तसेच स्थानिक न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्यापासून एसीपी, नवीमुंबई आयुक्तांकडेही लेखी तक्रारी दाखल केल्यानंतरही गुन्हा नोंदविण्यात पोलिस यंत्रणा दोन वर्षांपासून वर्षांपासून टाळाटाळ करीत होते. दोन वर्षांपासून विविध पोलिस ठाण्यांचे उंबरठे झिजविल्यानंतर गुरुवारी (१८ ) अखेर संबंधितांवर फसवणूक व इतर विविध कलमांखाली न्हावा-शेवा बंदर पोलिस ठाण्यात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.यामध्ये तत्कालीन उरण गटविकास अधिकारी निलम गाडे, जसखार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामोदर घरत, माजी उपसरपंच शैलेश ठाकूर, ग्रामसेवक राजेंद्र सातंगे आणि संबंधित विभागाचे जेएनपीटी, सिडको अधिकाऱ्यांही समावेश आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.

टॅग्स :uran-acउरण