शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या

By राजकुमार जोंधळे | Updated: June 2, 2025 20:59 IST

लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गेला. तेथे शिडीला त्याने गळफास घेतल्याचे आढळले.

राजकुमार जाेंधळे 

लातूर - जोतिबावरून परतताना परळी रेल्वे स्थानक समजून लातूर रेल्वे स्थानकावर उतरलेल्या ३१ वर्षीय तरुणाने लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना साेमवारी सकाळी १० वाजता समाेर आली. त्याबाबत विवेकानंद चाैक ठाण्यात आकस्मात मृत्यूची नाेंद केली आहे. नवनाथ वसंत चिवडे असे मृताचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, परळी वैजनाथ (जि. बीड) येथील हाेळकर चाैक परिसरात वास्तव्याला असलेला तरुण नवनाथ वसंत चिवडे हा चार दिवसांपूर्वी भावाला मी जोतिबा (जि. काेल्हापूर) देवाला जात आहे, असे सांगून घराबाहेर पडला. जोतिबावरून परळीकडे परतताना रविवारी रात्री ताे चुकीने लातूर रेल्वे स्थानकावर उतरला. रेल्वे स्थानकावरून बाहेर पडल्यानंतर त्याने भावाला माेबाइलवर संपर्क केला. भावाने सांगितले, वाट चुकली तरी नवीन रेणापूर नाका येथील बसस्थानकात जा... तेथे परळी वैजनाथला येणाऱ्या बसेस लागतील. भावाला ताे हाे म्हणाला...आणि त्याने माेबाइल बंद केला.

त्यानंतर ताे पहाटेपर्यंत परळीतील घरी परतलाच नाही. वाट चुकल्याने ताे रात्रभर भटकत राहिला. लातुरातील ६० फुटी राेडवरील गल्ली क्रमांक ८ येथे सुरू असलेल्या बांधकामावर गेला. तेथे शिडीला त्याने गळफास घेतल्याचे आढळले. घटनास्थळी पाेलिस निरीक्षक संताेष पाटील, सहायक पाेलिस उपनिरीक्षक विलास फुलारी यांच्यासह चार्ली पथकाने भेट देत पाहणी करुन पंचनामा केला. मृत नवनाथच्या पश्चात आई, दाेन भाऊ, पत्नी, दाेन मुले आहेत.

१० वाजता बांधकाम मजूर आल्यानंतर घटना समजली...बांधकामावरील मजूर साेमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आले असता, त्यांना बांधकामाच्या शिडीला गळफास घेतल्याचे आढळून आले. त्याची माहिती घरमालकाला दिली. विवेकानंद चाैक ठाण्याला त्यांनी कळविले. पाेलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

खिशामध्ये आधार कार्ड; मयताची पटली ओळख...मयताच्या खिशाची तपासणी केल्यानंतर पाेलिसांना आधार कार्ड आढळून आले. दरम्यान, या आधार कार्डावरूनच तरुणाची ओळख पटली. याची माहिती पाेलिसांनी तातडीने त्याच्या परळी येथील कुटुंबीयांना दिली. माहिती समजल्यानंतर परळी येथून भावाने काही वेळात लातुरात धाव घेतली.

पाच वर्षांपासून पत्नी राहते माहेरी...नवनाथ याची पत्नी पाच वर्षांपासून परभणी जिल्ह्यातील माहेरी राहत असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. काैटुंबिक कारणामुळेही त्याची मानसिक स्थिती बरी नव्हती, असे भावाने पाेलिसांना सांगितले. याच नैराश्यातून त्याने हे टाेकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे.