शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दहावीतील मुलाने नववीतील मुलाकडून उकळले १० लाख; दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 10:26 IST

आईने लॉकरमध्ये ठेवले होते अकरा लाख

सोलापूर : शिक्षिका असलेल्या आईला त्यांच्या वडिलांनी निवृत्तीच्या रकमेपैकी पाच लाख रुपये दिले. आईने त्यात भर घालून लॉकरमध्ये ११ लाख २५ हजार रुपये ठेवले. मात्र, त्यांच्या नववीत शिकणाऱ्या मुलाला त्याच्या दहावीतील मित्राने ठार मारण्याची धमकी देत टप्प्याटप्प्याने १० लाख रुपये उकळले. याप्रकरणी दहावीतील मुलासह एका नातेवाइकावर गुन्हा दाखल झाला आहे. 

फिर्यादी सिडगिद्दी यांचा कारखाना आहे. त्या खासगी शाळेत शिक्षिका आहेत. त्यांचा मुलगा शहरातील नावाजलेल्या शाळेत नववीचे शिक्षण घेत आहे. त्याची मैत्री त्याच शाळेतील दहावीतील मुलाशी झाली. फिर्यादीच्या मुलाने कपाटातील पैसे मित्रासोबत खर्च केले. याप्रकरणी दहावीतील एक मुलगा व नातेवाईक आकाश खेड यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.  

काय झाले समजून घेऊ !आरोपीने नववीतील मुलाला उसने घेतलेले पाचशे रुपये दिले नाहीत. आरोपीने पुन्हा पैसे मागताच नववीतील मुलाने नकार दिला. पुढे ठार मारण्याची धमकी देत आरोपीने पैसे मागितले. घाबरलेल्या नववीतील मुलाने आधी पाच हजार रुपये दिले. पुढे आरोपी धमक्या देत गेला अन् मुलगा पैसे देत गेला. दहावीच्या मुलाने असे ८ लाख रुपये उकळले. नातेवाइकाने घेतले २ लाख दहावीतील मुलाने पैसे घेतल्याचा प्रकार त्याच्या नातेवाइकाला सांगितला. नातेवाइकानेही मुलाला धमकावत २ लाख रुपये घेतले. सहा महिन्यांनंतर घटना उघडकीस कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रक्कम डिसेंबर २०२२ मध्ये मोजली होती. चावी कपाटातच ठेवलेली होती. त्यानंतर पैसे मोजल्यानंतर कपाटात फक्त एक लाख रुपये होते.