शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम कॅश व्हॅनसह ७८ लाख पळविले; आरोपींना १२ वर्षांनंतर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 11:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : एटीएम कॅश व्हॅनसह ७८ लाख पळविण्याच्या सुमारे १२ वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन दोन ...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एटीएम कॅश व्हॅनसह ७८ लाख पळविण्याच्या सुमारे १२ वर्षांपूर्वी घडलेल्या गुन्ह्याचा शोध घेऊन दोन आरोपींना कांदिवली पोलिसांनी अटक केली. अरुण वाघमारे आणि सतीश आगळे अशी या दोघांची नावे आहेत.

या दोघांनी २०१२ मध्ये एटीएम कॅश व्हॅनसह सुमारे ७८ लाख रुपयांची रक्कम घेऊन पळ काढला होता. संशयितांचे माजी सहकारी २०१२ मध्ये एमजी रोड येथील एटीएममध्ये काही रक्कम भरण्यात व्यस्त असताना ही घटना घडली होती. कॅश व्हॅन वाघमारे चालवत  असल्याने त्याने व्हॅनमधील पैसे, वाहनासह पळ काढला.  त्यानंतर वाहन कांदिवलीतील एका निर्जनस्थळी सोडून ते पसार झाले होते. या घटनेनंतर हे दोघे जवळपास १२ वर्षे फरार होते. पोलिसांनी वाघमारेकडून ३१ लाख रुपये हस्तगत केले. दहिसरच्या कांदरपाडा परिसरात त्याने प्लास्टिकमध्ये गुंडाळून काही रोख रक्कम पाण्याने भरलेल्या ड्रममध्ये ठेवली आणि उर्वरित घेऊन पळून गेला होता. पोलिस उपनिरीक्षक नितीन साटम यांच्यासह चार अधिकाऱ्यांचे पथक सांगलीला रवाना झाले आणि त्यांनी वाघमारेला वेकसेनवाडी विश्रामबाग परिसरातून अटक केली, तर सतीशचे मूळ गाव असलेल्या लातूर जिल्ह्यातील खेडे येथून २१ मे रोजी त्याच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, त्यांची अधिक चौकशी सुरू असल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

गुन्ह्यानंतर वाघमारे सांगलीत मजूर म्हणून काम करत होता.  सतीशही त्याच्या मूळ गावी पालकांसह राहत होता. मात्र, वाघमारे हाच या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार होता, जो अवघ्या दहा दिवसांपूर्वी कंपनीत कामाला लागला आणि संधी साधून वाहनांसह ७८ लाख रुपये घेऊन पळाला, असे पोलिसांनी सांगितले.

 

टॅग्स :atmएटीएम