शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

७५ किलो गांजा, ४,८०० कोडीन बॉटल्स जप्त, उल्हासनगरमध्ये एनसीबीचा छापा, सहा अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2024 06:32 IST

एका आंतरराज्यीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी ७५ किलो गांजा आणि ४८०० कोडीन बॉटल्स अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. 

एका आंतरराज्यीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या टोळीतील तस्करांनी कुरियरद्वारे अमली पदार्थ मागविल्याची माहितीही अधिकाऱ्यांना मिळाली होती.  

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी  सहा तस्करांना जेरबंद करून त्यांच्याकडून  ७५ किलो गांजा आणि ४,८०० कोडीन बॉटल्स जप्त केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी संबंधित कुरियरच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला होता. काही वेळाने एक व्यक्ती ते पार्सल घेण्यासाठी आली. त्या व्यक्तीने ते पार्सल घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला घेरले. विनोद पी. असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या चौकशीत त्याने टोळीतील इतरांची माहिती दिली. त्या अन्य पाच जणांना भिवंडी येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे एक लाख १८ हजार ८६० रुपये आढळले. ते जप्त करण्यात आले आहेत.

टॅग्स :Drugsअमली पदार्थulhasnagarउल्हासनगर