शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

व्हायग्रा, लीव्हेट्रावर ५० टक्के डिस्काउंट! बंदी असतानाही परदेशात विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 08:45 IST

अमेरिकन नागरिकांचे टोपण नाव धारण करून त्याची माहिती प्राप्त करायचे. त्यानंतर बंदी असलेली औषधे तीस ते पन्नास टक्के सूट देऊन विकत देण्याचे आमिष दाखवायचे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लैंगिक क्षमता तात्पुरती वाढविणाऱ्या मात्र शरीरावर विपरीत परिणाम करत असल्याने बॅन अशा व्हायग्रा, सीआलीस आणि लीव्हेट्रा (गोळी आणि जेल) सारखी औषधे ५० टक्के डिस्काउंटवर मिळतील, अशी ऑफर देत क्रेडिट व डेबिट कार्डने अमेरिकन नागरिकांकडून डॉलर्स घ्यायचे. मात्र, त्यानंतर त्यांची फसवणूक करणाऱ्या ५ जणांच्या टोळक्याला बोरिवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे.

 आरोपींनी यासाठी गोराईमध्ये उभारलेले एक अवैध कॉल सेंटर देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहे. बोरवली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांना माहिती मिळाली होती की लाइफस्टाइल फिटनेस प्रोडक्शन नावाखाली बोरिवलीतील भीमनगर येथील बंगल्यात इंटरनेटवर अमेरिकन नागरिकांना कॉल केला जातो; कॉलर स्वतःला अमेरिकन नागरिक असल्याचे भासवत अमेरिकन ॲक्सेंटमध्ये संभाषण करत त्यांचा विश्वास संपादन करतो. त्यानंतर व्यवहार होतो. याची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजय माडये, सहायक निरीक्षक सागर साळुंखे उपनिरीक्षक प्रमोद निंबाळकर आणि पथकाने या कॉल सेंटरवर धाड टाकली. त्यांचा चौकशीमध्ये अनेक गोष्टी उघड झाल्या. 

टोपण नावाने...हे कॉलर अमेरिकन नागरिकांचे टोपण नाव धारण करून त्याची माहिती प्राप्त करायचे. त्यानंतर बंदी असलेली औषधे तीस ते पन्नास टक्के सूट देऊन विकत देण्याचे आमिष दाखवायचे. त्या मोबदल्यात ते अमेरिकन नागरिकांकडून अमेरिकन डॉलरमध्ये पैसे घ्यायचे त्यानुसार पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्या लोकांनी अनेकांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे, असे  बोरिवली पोलिसांनी सांगितले.