शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

नागपुरात जमिनीच्या वादात डॉक्टरला मागितले ५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 23:39 IST

कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करून डॉक्टरला ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. बेलतरोडी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे डॉक्टरने या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

ठळक मुद्देहल्ला करून जमीन बळकावण्याचा प्रयत्नहुडकेश्वर पोलिसांची संशयास्पद भूमिका, पोलीस आयुक्तांनी फटकारल्यामुळे झाली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करून डॉक्टरला ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. बेलतरोडी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे डॉक्टरने या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.धंतोली येथील रहिवासी डॉ. इंदर गुंडेचा यांची हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरात १६०२४ चौरस फूट जमीन आहे. १९६७ मध्ये डॉ. गुंडेचा यांच्या वडिलांनी ही जमीन खरेदी केली होती. त्यानंतर या जमिनीवर डॉ. गुंडेचा यांचा ताबा आहे. जमिनीच्या जवळ एक खासगी सोसायटी आहे. २००० मध्ये सोसायटीने आपल्या मालकीचे सर्व प्लॉट विकले. काही दिवसांपासून एका नेत्यासह परिसरातील सात-आठ जण गुंडेचा यांच्याशी वाद घालत आहेत. ते विक्री झालेले प्लॉट डॉ. गुंडेचा यांच्या जमिनीवर असल्याचा दावा करीत आहे. डॉ. गुंडेचा यांनी त्यांना सीटी सर्व्हे, नासुप्र आणि इतर शासकीय विभागाने जारी केलेले कागदपत्रांवर रजिस्ट्रीत दाखविलेल्या प्लॉटशी त्यांच्या जमिनीचा संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर गुंडेचा यांची डोकेदुखी वाढली. त्यांना ५० लाखाची मागणी करण्यात येऊ लागली. दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना धमकी देणे सुरू झाले. डॉ. गुंडेचा यांच्या तक्रारीनुसार ते आपल्या जमिनीवर येताच त्यांना पैशांसाठी धमकी दिली जाऊ लागली. प्रतिसाद न दिल्यामुळे २५ जानेवारीला रात्री उशिरा असामाजिक तत्त्वांनी डॉ. गुंडेचा यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकी देऊन सूचना फलकाला आग लावली. २६ जानेवारीला गुंडेचा यांनी हुडकेश्वर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करण्याचे सोडून दोन्ही पक्षांना नोटीस जारी केली. डॉ. गुंडेचा २७ जानेवारीला सकाळी धार्मिक कार्यासाठी भद्रावतीला जाणार होते. त्यांना आपण जाताच पोलिसांच्या मदतीने जमिनीचा ताबा घेण्याचा संशय आला. त्यांनी बाहेरगावी जाण्याची सूचना देऊन हुडकेश्वर पोलिसांना सतर्क केले. ते रवाना होताच दुपारी असामाजिक तत्त्वांनी हल्ला करून गुंडेचा यांचे सूचना फलक तोडून आग लावली. सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकी देऊन जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच गुंडेचा यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला सूचना दिली. बेलतरोडी ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासमोर असामाजिक तत्त्व तोडफोड करीत होते. डॉ. गुंडेचा यांनी त्वरित नागपूरला येऊन हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता डॉ. गुंडेचा यांनाच प्रश्न विचारणे सुरु केले. त्रस्त होऊन डॉ. गुंडेचा यांनी बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी याबाबत पोलिसांना फटकारले. डॉ. गुंडेचा यांनी झोन चारच्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांची भेट घेऊन त्यांनाही याची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. डॉ. गुंडेचा यांच्या मते त्यांनी जमिनीची मालकी आणि त्यावर ताबा मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुरावे देऊनही हुडकेश्वर पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलीस आयुक्तांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांची वागणूक बदलली. त्यांनी प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यास असामाजिक तत्त्वांसोबत हुडकेश्वर पोलिसांची जवळीक असल्याचा खुलासा होणार असल्याचा दावा केला आहे. हुडकेश्वरचे निरीक्षक राजकमल वाघमारे दोन दिवसांपासून हे प्रकरण हाताळत आहेत. परंतु त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेर असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले.हुडकेश्वर परिसरातील वातावरण तापलेकाही दिवसांपासून हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरातील वातावरण तापले आहे. पिपळा गावात गणराज्य दिनानिमित्त आयोजित सभेत दोन गटात मारहाण झाली. त्यानंतर पाच तासानी माजी सरपंच किशोर वानखेडे यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. या घटनेच्या तीन दिवसानंतरही हल्ल्यातील आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी पकडले नाही. घटनेनंतर पिपळात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनेचे पुरावे शोधण्यासाठी वानखेडे यांचे कार्यालय गाठले. पोलिसांच्या भूमिकेमुळे हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरात अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdoctorडॉक्टर