शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! तुरुंगात ५ पोलीस कर्मचाऱ्यांचा महिलेवर १० दिवस बलात्कार  

By कुणाल गवाणकर | Updated: October 19, 2020 13:21 IST

Crime News: तुरुंगातील पाहणी दरम्यान प्रकार उघडकीस; न्यायालयीन चौकशीचे आदेश

भोपाळ: पोलीस कर्मचाऱ्यांनी तुरुंगात सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप एका महिलेनं केला आहे. खुनाचा आरोप असलेल्या २० वर्षीय महिलेनं पाच पोलिसांवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. मध्य प्रदेशातल्या रेवा जिल्ह्यातल्या मंगावन शहरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मे महिन्यात पोलिसांनी १० दिवस सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश, विधि अधिकारी आणि दोन वकिलांनी १० ऑक्टोबरला तुरुंगाची पाहणी केली. तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तुरुंगात असलेल्या पीडित महिलेनं तिची व्यथा अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांना सांगितली. त्यानंतर या प्रकरणी न्यायाधीशांनी न्यायालयीन चौकशीचे दिले. रेवाचे पोलीस अधीक्षक राकेश सिंह यांनी या प्रकरणावर भाष्य करताना वेगळाच दावा केला. '९ मे ते २१ मे दरम्यान अत्याचार झाल्याची तक्रार संबंधित महिलेनं केली आहे. मात्र आम्ही तिला आणि तिच्या मैत्रिणीला २१ मे रोजी अटक केली. खुनाच्या आरोपाखाली मंगावान पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोघींना ताब्यात घेण्यात आलं,' असं सिंह यांनी सांगितलं.अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी १० ऑक्टोबरला तुरुंगाची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या विधि पथकातले वकील सतीश मिश्रांनी पीडित महिलेकडे इतके महिने गप्प का राहिलीस, याबद्दल विचारणा केली. त्यावर तीन महिन्यांपूर्वी आपली आपबिती वॉर्डनच्या कानावर घातली होती. अत्याचार करणारा पोलीस कर्मचारी तुरुंगातच असल्यानं याबद्दल भीती वाटत होती, असं पीडितेनं सांगितल्याची माहिती मिश्रांनी दिली. तुरुंगात घडलेल्या प्रकाराबद्दल वाच्यता केल्यास तुझ्या वडिलांनी खून प्रकरणात गोवण्यात येईल, अशी धमकी पोलिसांनी दिली होती. पीडित महिलेनं तिच्यासोबत घडलेला प्रकार ३ महिन्यांपूर्वी आपल्याला सांगितला होता, याची माहिती वॉर्डननं दिली. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी तिचा जबाब नोंदवला. तो जिल्हा न्यायाधीशांकडे पाठवण्यात आला. यानंतर या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले. 

टॅग्स :Rapeबलात्कार